Farmer Loan Waiver : 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा फैसला? 2 लाखांपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

Big relief for Maharashtra farmers; government likely to announce loan waiver up to ₹2 lakh before June 30 : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झाल्याची माहिती देत, बनावट बी-बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा अन् कांदा खरेदीबाबतही सरकार सक्रिय असल्याचे सांगितले.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Farmer Loan Waiver 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली वेगाने सुरू असून, 30 जूनपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर दौऱ्यावर असताना कृषिमंत्री भरणे (Dattatray Bharne) यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा कृषिमंत्र्यांना दिला. कार्यक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कारही करण्यात आला. आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्यासह अनेक उपस्थित होते.

कर्जमाफीबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी (Farmer) कर्जमाफीची घोषणा केली आहे. यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे सादर झाला असून 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय होईल. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.”

Dattatray Bharne
Onion Prices Crash : कांद्याला 1 रुपया किलो भाव; शेतकरी संतप्त , जमिनी पंतप्रधानांच्या नावावर करून देण्याचा इशारा

या घोषणेमुळे राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीच्या चर्चेमुळे ग्रामीण भागात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

Dattatray Bharne
PM Modi Gujarati letter : मोदींना मराठीतून वेदना समजणार नाहीत? कांदा दरघटीवर संतप्त शेतकरी पुत्राचे गुजरातीत पत्र, राज्यभर चर्चेला उधाण

राज्यात बनावट बी-बियाणे विक्री करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांचे परवाने थेट रद्द करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

“शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे भरणे यांनी ठामपणे सांगितले.

कांदा उत्पादकांसाठीही दिलासा?

राज्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावर बोलताना भरणे यांनी सांगितले की, पणनमंत्री जयकुमार रावल विविध उपाययोजना करत असून सरकारकडून कांदा खरेदी सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे.

पेट्रोल-डिझेल टंचाईवर काय म्हणाले?

राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, “इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, पूर्वीपेक्षा 20 ते 30 टक्क्यांनी इंधन खरेदी वाढली आहे. त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरते प्रश्न निर्माण होत आहेत.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com