Sunil Tatkare  Sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare : अजितदादांच्या 'NCP'साठी खुशखबर! सुनील तटकरेंवर केंद्रात मोठी जबाबदारी

Rashmi Mane

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीमध्ये नाराजी बघायला मिळत होती. अजित पवार गटातील नेतेमंडळी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे महायुतीतून अजित पवार बाहेर पडतील अशा चर्चा होत्या. त्यातचा मोदी सरकारकडून खासदार सुनील तटकरेंना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सुखद धक्का ठरला आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून नाराजीनाट्य सुरु होते. भाजप आणि शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे महायुतीतून अजित पवार बाहेर पडतील अशा जोरदार चर्चा रंगल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नव्या ट्विस्टमुळे महायुतीतील राजकीय गणित स्थिर राहणार का? असे तर्क वि वर्तवण्यात येत आहे.

पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

गुरुवारी संसदेच्या स्थायी समित्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांना महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्राने सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची सरकारच्या पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे सुनील तटकरे यांचे राजकीय वजन वाढणार आहे. तर महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे (Shivsena Shinde Group) गटाचे खासदार श्रीरंग बारणे ऊर्जाविषयक संसदीय समितीचे नेतृत्व करणार आहेत.

संसदेची स्थायी समिती म्हणजे काय?

संसदेच्या स्थायी समित्या म्हणजे संसदेत स्थापन केलेल्या अशा समित्या आहेत ज्या एखाद्या विशिष्ट विषयाशी किंवा मंत्रालयाशी संबंधित प्रकरणांचा सखोल अभ्यास करतात. या समित्या संसदेची मुख्य कामे अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत करतात. या समित्या सरकारने आणलेल्या विधेयकांचा सविस्तर अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना करतात.

स्थायी समित्या किती प्रकारच्या असतात?

स्थायी समितीचे तीन प्रकार आहेत. यामध्ये आर्थिक समित्या, विभागाशी संबंधित समित्या आणि इतर प्रकारच्या स्थायी समित्यांचा समावेश होतो. त्यात 22 ते 30 सदस्य आहेत. प्रत्येक समितीमध्ये 31 सदस्य आहेत. त्यापैकी 21 लोकसभा आणि 10 राज्यसभा सदस्य आहेत. यामध्ये गृह, उद्योग, कृषी, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे, शहरी विकास, ग्रामीण विकास या विभागांच्या समित्या असतात. दरम्यान, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2024-25 या वर्षासाठी 24 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT