Rajan Patil : राजन पाटलांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ; सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली हाती...

State Cooperative Council : राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राजन पाटील यांच्या नियुक्तीचे परिपत्रक आजच जाहीर झाले आहे. आज पासून पुढील तीन वर्षापर्यंत अथवा पुढील शासन निर्णय होईपर्यंत राजन पाटील हे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राहणार आहेत.
Rajan Patil
Rajan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 September : मोहोळ मतदारसंघावर सलग तीस वर्षे वर्चस्व राखणारे माजी आमदार राजन पाटील यांना त्यांच्या पक्षनिष्ठेची कदर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्याय दिला आहे. मोहोळमध्ये नुकत्याच झालेल्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या शब्दानुसार राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राजन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांना पक्षनिष्ठेचे बक्षीस मिळाल्याचे मानले जात आहे.

राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राजन पाटील (Rajan Patil) यांच्या नियुक्तीचे परिपत्रक आजच जाहीर झाले आहे. आज पासून पुढील तीन वर्षापर्यंत अथवा पुढील शासन निर्णय होईपर्यंत राजन पाटील हे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राहणार आहेत.

राजन पाटील हे 1995 पासून 2004 पर्यंत मोहोळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवून निवडून आले होते. ते शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना झाल्यानंतर राजन पाटील यांनी शरद पवारांना साथ देत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 आणि 2004 या दोन्ही निवडणुका त्यांनी घड्याळ चिन्हावर लढवल्या आणि जिंकल्या. मात्र, पाटील यांच्या ऐन उमेदीच्या काळात 2004 च्या पुनर्रचनेत मोहोळ मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला. मात्र, स्वतःची आमदारकी हुकली तरी त्यांनी पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही. त्यामुळे मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही राजन पाटील यांनी मोहोळवर आपले वर्चस्व कायम राखले.

Rajan Patil
Rashmi Shukla : रश्मी शुक्लांविरोधात काँग्रेस आक्रमक; पोलिस महासंचालकपदावरून हटविण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

मोहोळ मतदारसंघातून 2004 पासून 2019 पर्यंतच्या झालेल्या सर्व तीन निवडणुकांमधूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणला. मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काचा आमदार देण्यात राजन पाटील यांनी आतापर्यंत कोणतीही कसूर ठेवलेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काचा आमदार देणारे राजन पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून गेल्या काही वर्षांपासून होत होती. मात्र, त्यांना सत्तेच्या राजकारणात संधी मिळत नव्हती, त्यामुळे समर्थकांमध्ये काहीशी नाराजीची भावना होती.

Rajan Patil
Vidarbh Politics : मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय अपक्ष आमदाराने वाढविला सस्पेन्स; कोणत्या पक्षाकडून विधानसभा लढणार?

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजन पाटील यांना संधी मिळावी, अशी मागणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यापुढेच समर्थकांकडून करण्यात आली होती. त्याच यात्रेत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजन पाटील यांना लवकरच योग्य ठिकाणी संधी देण्यात येईल, असे सांगितले होते.

मोहोळमधील सभेनंतर आठवडाभरातच राजन पाटील यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेषतः अजित पवार यांच्याकडून राजन पाटील यांच्या पक्षनिष्ठेचे दखल घेत त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचे काम पक्षाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com