Sunil Tatkare sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफी मिळणार? तटकरेंनी दिले संकेत; म्हणाले, 'आमचा यू टर्न...'

Farmer loan waiver : राज्यातील महायुतीने निवडणुकीच्या प्रचारात सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. पण अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत आपण कधीच वक्तव्य केलं नसल्याचे म्हटलं होतं.

Aslam Shanedivan

Farmer loan waiver News : राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी विधानसभा निवडणूक कालावधीत महायुतीने शेतकरी कर्जमाफीसह अेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी काही सत्यात उतरल्या तर काही आता बंद झाल्या आहेत. तर शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवर याआधीच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हात वर केले असून आपण याबाबत कधी वक्तव्य केलेलं नाही, असं म्हटलं होतं. यामुळे फक्त निवडणुकीसाठी ही घोषणा करण्यात आल्याचे समोर आले होते. पण आता याच घोषणेवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीपासून , 'आम्ही यू टर्न घेतलेला नाही. जाहीरनाम्यातील घोषणा टप्प्याटप्याने पूर्ण केल्या जातील असे म्हटलं आहे.

राज्याच्या निर्मितीला 65 वर्ष पूर्ण होत असून त्यासाठी 1 ते 4 मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. यावेळी त्यांनी, शेतकरी कर्जमाफीसह लाडकी बहीण योजनेसह इतर गोष्टींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी, लाडकी बहीण योजना यशस्वी योजना असून ती सरकारची सर्वात यशस्वी योजना असल्याचे म्हटलं आहे.

पण या योजनेचा राज्याच्या तिजोरीवर परिणाम होत असून इतर विभागांच्या निधीला फटका बसल्याच्या प्रश्नावर तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, या योजनेत आजही महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे. त्यामुळे ही योजना भविष्यात देखील बंद होणार नाही.

तर राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी आम्ही खूप कामे केली आहेत. तर प्रचाराच्या दरम्यान जाहीरनाम्यातून अनेक घोषणा केल्या आहेत. ज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देखील घोषणा होती. भाजप, शिवसेना आणि आम्ही तिघांनीही महायुतीच्या संयुक्त जाहीरनाम्यात याची घोषणा केली होती.

यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी या घोषणेपासून 'आम्ही यू टर्न घेतलेला नाही'. जाहीरनाम्यातील सर्वच घोषणा या टप्प्याटप्प्याने नक्की पूर्ण केल्या जातील. यासाठी राज्य सरकार कार्यवाही करत असल्याचेही तटकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT