Snehal Jagtap Meet Sunil Tatkare : कोकणात राजकीय भूकंप? ठाकरे गटासह BJP धक्का! स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत?

Snehal Jagtap Meet Sunil Tatkare : ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप या काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होत्या. तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यावर अंकुश ठेवण्यासह अजित पवार गटाला शह देण्यासाठी भाजपने ही रणनीती आणखी होती. पण आता सगळं उलटी गेम झाली आहे.
Snehal Jagtap uddhav thackeray And Sunil Tatkare
Snehal Jagtap uddhav thackeray And Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on

Raigad News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत असून बडे चेहरे भाजपसह शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कोकणात देखील सगळ्या मोठे धक्के ठाकरे गटाला बसले असून कोकण शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने पोखले आहे. यामुळे ठाकरे गटात आता काहीच प्रमुख चेहरे शिल्लक आहेत. अशातच रायगडमध्ये शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला आवाहन असणारा चेहराच आता सहकुटूंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे शिवेसेनेचा रायगडमधील महत्वाचा असणारा चेहरा स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली असून बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा केलीय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सूसाट असून महाविकास आघाडीकडे आता चेहरेही शिल्लक राहिलेले नाहीत. यात आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर सुरू झाले आहे. अनेक नेत्यांनी पक्ष बदलात उड्या घेतल्या आहेत. अशातच अशातच महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून एकाकी झूंझ देणाऱ्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाला रामराम केला केला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. तर लवकरच त्या प्रवेश करतील अशा चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागल्या आहेत. या चर्चांच्या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जगताप कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांसमवेत खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीमधील गीताबागमध्ये दाखल झालं त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ नेत्यांमध्ये चर्चा झाली. लवकरच राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या तयारीची होणार घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री पदावरून सुनिल तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात खटके उडाल्यानंतर सुनिल तटकरे यांची राजकीय खेळी सुरू झाल्याची देखील आता चर्चा आहे. महायुतीत नव्या वादाला वेगळं वळण मिळण्याची चर्चा आहे.

Snehal Jagtap uddhav thackeray And Sunil Tatkare
Snehal Jagtap : भाजपचे महाडमध्ये 'ऑपरेशन लोटस'? स्नेहल जगताप यांच्या प्रवेशानं कशी गणितं बदलणार?

स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्ष राहील्या असून त्या माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. तर स्नेहल जगताप विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. तर विधानसभा निवडणूक लढवली होती. स्नेहल जगताप यांनी भरत गोगावले यांना जोरदार टक्कर दिली होती.

भेटीवर तटकरेंची प्रतिक्रिया

स्नेहल जगताप यांच्या भेटीवर आणि राष्ट्रवादीतील प्रवेशांच्या चर्चेवर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे यांनी स्नेहल जगताप, त्याचे कुंटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज आपली सदिच्छा भेट घेतली आहे. पण त्यांनी त्याच्या पक्ष प्रवेशावर अधिक भाष्य करणं टाळत योग्य वेळ आल्यावर पुढील राजकीय निर्णय घेऊ असे म्हटलं आहे.

दरम्यान स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गट सोडल्यानंतर आणि आता तटकरेंची भेटीच्या चर्चांवर मातोश्रीवरुन त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, यात शिवसेना नेत्यांना यश आले नसून दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्तीमुळे नाराजी नाट्यात तेल ओतण्याचे काम झाले आहे. या नियुक्तीमुळे जगताप कुटुंबिय अधिकच नाराज झाले होते. यामुळेच आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक साधली आहे.

Snehal Jagtap uddhav thackeray And Sunil Tatkare
Nana Patole यांची Uddhav Thackeray यांच्यावर नाराजी |MVA | Congress| Snehal Jagtap|Sarkarnama Video

स्नेहल जगताप यांचा पराभव

रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांचा 26 हजार 210 मतांनी पराभव पराभव केला होता. त्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. स्नेहल जगताप यांना 91,232 तर गोगावले यांना 1,17,442 मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com