Amit Shah Sunil Tatkare dinner : अमित शाहांबरोबर शिवसेना मंत्र्यांच्या स्नेहभोजनाचा योग 'फसला की फसवला'? तटकरे अन् गोगावलेंच्या विधानांमध्ये मोठा विरोधाभास

Union Home Minister Amit Shah NCP Sunil Tatkare Raigad Shiv Sena ministers Bharat Gogawale political Maharashtra : भाजप नेते अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मंत्री आमंत्रण देऊन उपस्थित नव्हते.
Sunil Tatkare Bharat Gogawale 1
Sunil Tatkare Bharat Gogawale 1Sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena ministers absent : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी त्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद शिगेला पोचला असला, तरी अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्तानं सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्‍यांना घरी स्नेहभोजनासाठी बोलावलं होतं.

पण मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा अमित शाह यांच्याबरोबर स्नेहभोजनाचा योग जुळून आला नाही. हा योग 'फसला की फसवला गेला', अशी चर्चा आता रायगडसह मुंबईच्या राजकारणात सुरू झाली आहे.

भाजप नेते अमित शाह यांनी रायगडवरील कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला हजेरी लावली. या स्नेहभोजनाला शिवसेना मंत्री यांना बोलवण्यात आलं होते. विशेष करून, पालकमंत्रिपदावरून नाराज असलेले मंत्री भरतशेठ गोगावले यांना विशेष आमंत्रण होते. पण ते गैरहजर राहिले.

Sunil Tatkare Bharat Gogawale 1
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंची शिवसेना मित्रपक्षाला 'कात्रजचा घाट' दाखवणार; महापालिका निवडणुकांसाठी भाजप अन् राष्ट्रवादीला बाजूला सारणार?

सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, माझं कर्तव्य होते, मी भरतशेठ यांना बोलावलं होतं. त्याचबरोबर शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री उदय सामंत, महेंद्र दळवी यांनाही बोलावले होते. ते का आले नाही, मला माहीत नाही, असे सांगितले. राजकारणाच्या पलीकडे, विशिष्ट बाबींच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्पराचे स्नेहसंबंध राहिले पाहिजे, ही यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये रुजवली संस्कृती आहे. ते संस्कार आमच्या सर्वांवर झाले आहेत, असेही तटकरे यांनी म्हटले.

Sunil Tatkare Bharat Gogawale 1
Gold Tariffs Impact : 'टॅरिफ' अन् सोन्या-चांदीची दरवाढ; इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन पुन्हा मोठा अंदाज

शिवसेना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्नेहभोजनाला का जाता आले नाही, यावर प्रतिक्रिया दिली. रायगड किल्ल्यावर मागच्या रोप-वेला थांबल्यामुळे भोजनाच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. सुनील तटकरे यांनी भोजनाचं निमंत्रण दिलं होतं. अमित शहा आणि त्यांचा ताफा एका ट्रॉलीमध्ये बसून खाली पुढे गेला, त्यात जागा नव्हती. प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, धैर्यशील पाटील, प्रशांत ठाकूर आम्ही सोबत मागे राहिलो. आम्ही उतरण्या आधी त्यांचा ताफा पुढे निघून गेला होता. हेलिकॉप्टरमध्ये काही दुसऱ्या लोक बसल्याने जागा मिळाली नाही. गाडीने जाईपर्यंत त्यांचं खाणपान संपणार होतं. त्यामुळे मला जातं आलं नाही, असे भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं.

दरम्यान, तटकरे अन् गोगावले यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अजून काही बनत नसल्याचं दिसतं आहे. रायगडचा पालकमंत्रिपदाचा तिढा अजून कायम आहे. अमित शाह यांनी या तिढ्याकडे देखील बघितलं देखील नाही. त्यामुळे स्नेहभोजना शिवसेना मंत्र्‍यांचा योग 'फसला की फसवला गेला', याची चर्चा आता रायगडसह मुंबईच्या राजकारणा रंगू लागली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com