Sunil Tatkare On Manoj Jarange sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare On Manoj Jarange : 'मनोज जरांगेंनी हवं ते बोलावं पण....', मारहाणीच्या आरोपावर सुनील तटकरेंनी सुनावलं

Vijaykumar Ghadge Patil Assault Case Sunil Tatkare : मनोज जरांगे पाटीलसाहेबांकडे जी यंत्रणा असेल ती त्यांनी लावावी, असे आव्हान सुनील तटकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले.

Roshan More

Sunil Tatkare Politics : 'छावा' संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी विजयकुमार यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बोलताना विजयकुमार यांना मारहाण चव्हाण यांनी केली असली तरी यामागचा मास्टर माईंड सुनील तटकरेच असल्याचा आरोप केला होता. तटकरे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचे देखील जरांगे म्हणाले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'मनोज जरांगे पाटीलसाहेबांच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. माझ्या 41 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझी सामाजिकदृष्ट्या असलेली भूमिका मतदारसंघाना नव्हे रायगड जिल्ह्याने, कोकणाने आणि उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. मी नेमका काय आहे हे सर्वांनी पाहिलेले आहे. माझ्या सर्वाजनिक जीवनात साधीशी एनसीसुद्धा माझ्या विरोधात नाही.'

'अनेकवेळा राजकीय संघर्ष हा पराकोटीचा आला पण कधी मी या गोष्टीला माझ्या मनात थाराच दिला नाही. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटीलसाहेबांकडे जी यंत्रणा असेल ती त्यांनी लावावी. सरकारकडे त्यांनी तक्रार करावी. सरकारने सर्व तपास यंत्रणेच्या मार्फत त्याठिकाणी तपास करावा. माझी त्यामध्ये हरकत असण्याचे कारण नाही. कारण माध्यामांकडेसुद्धा व्हिडिओ आहेत. त्यात आपण तु्म्ही पाहू शकता. 'छावा' संघटनेचे पदाधिकारी काय शब्द बोलत होते, पत्ते टाकत होते तरी मी किती संयमाने स्वीकारले त्यांचे निवेदन स्वीकारत त्यांचे आभार मानले. जरांगे पाटलांना जे वाटतं ते त्यांनी जरूर बोलावं. मी काय आहे हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत.', असे देखील

कोकाटेंच्याबाबतीत अजितदादा बोलतील...

माणिकराव कोकाटेंच्या ऑनलाईन पत्ते खेळत असतानाचा व्हिडिओसमोर आला. त्याबाबत तटकरे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, माझं या संदर्भात कोकाटेंशी बोलणं झालं नाही. त्यादिवशी मी लातूर, धाराशीवच्या दौऱ्यावर होते. त्यांचे आणि दादांचे बोलणे झाले असेल तर मला माहिती नाही. विधीमंडळाच्या अखत्यारित हा विषय आहे. सभापतींच्या नियंत्रणाखालील हा भाग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT