Parth Pawar Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Parth Pawar Land Controversy : पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरण अजितदादा स्पष्ट काय ते सांगणार; राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने दिले संकेत

Sunil Tatkare Ajit Pawar : मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी सगळ्या कागदपत्रांची तपासणी करून अजित पवार हे बाजू मांडणार आहेत.

Roshan More

Sunil Tatkare News : मुंढव्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. ज्या कंपनीने हे व्यवहार केले त्याचे मालक पार्थ पवार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा देखील झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत अजित पवार हे स्वतः सगळ्या कागदपत्रांची माहिती घेऊन माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ते पत्रकार परिषद आज घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील.निश्चितपणे ते सविस्तरपणे भूमिका मांडतील.

पार्थ पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्याचे परिणाम आगामी निवडणूक होतील का? असा प्रश्न तटकरे यांना पत्रकारांनी विचारले असते ते म्हणाले, बारामती, पुणे हा बालेकिल्ला होता आजही आहे. काही प्रश्न उद्भवत असतात हे जनतेला माहिती आहे.मात्र,त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल, असे मला वाटत नाही.

अजित पवार मुख्यमंत्र्याच्या भेटीला

अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नेमकी भेट कोणत्या कारणासाठी होत आहे याची माहिती समोर आली नाही. दरम्यान, अजित पवार यांनी काल बोलताना मी कोणत्याही नातेवाईकाच्या कामासाठी कोणत्या अधिकाऱ्याला फोन लावत नाही, असे सगळ्यांना माहीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT