Mahayuti self-reliance strategy: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा 'स्वबळाचा' बिगुल; मित्रपक्षाकडून उमेदवारांची जुळवाजुळव !

Political News : विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची वेळ आली तर महायुतीमधील तीन मित्रपक्षाकडून माजी आमदारांना पक्षात प्रवेश देऊन जुळवाजुळव केली जात आहे.
Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Mahayuti Politics Local Body Elections 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरात इनकमिंग सुरु आहे. महाविकास आघाडीमधील नेतेमंडळी मोठया संख्येने महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. 2029 मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीमधील तीन पक्ष कामाला लागले आहेत. या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची वेळ आली तर महायुतीमधील तीन मित्रपक्षाकडून माजी आमदारांना पक्षात प्रवेश देऊन जुळवाजुळव केली जात आहे.

2029 साली होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून आतापासूनच तयारी केली जात आहे. भाजपकडून 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकीकरता शत प्रतिशत भाजपचा नारा देण्यात आला आहे. महायुतीमधील मित्रपक्षांनी देखील भाजपला आव्हान देण्यासाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात महायुतीमधील तीन पक्षात इनकमिंग होत आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
BJP Vs Congress : सत्ता भाजपची; तरी काँग्रेसने फोडला घाम : बहुमत मिळवताना अक्षरश: दमछाक

शत-प्रतिशत भाजप (BJP) या घोषणेचा धसका घेऊन महायुतीमधील मित्रपक्षांनीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून ही विधानसभेत पराभूत झालेल्या माजी आमदारांना व दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना पक्षात घेण्याच्या संदर्भात हालचाली वाढू लागल्या आहेत. काही ठिकाणी प्रवेश देऊन बाजीही मारली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत चुरस वाढणार आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Shivsena UBT News : 'क्या हुआ तेरा वादा' शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा, स्टेअरिंग दानवेंच्या हाती!

गेल्या काही दिवसात शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडील इनकमिंग वाढले आहे. गेल्या काही दिवसापासून माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने-पाटील, हेमलता पाटील, प्रीती बंड, निलेश सांबरे या सर्व नेत्यांची पक्षप्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिंदे सेनेकडून बळ वाढवले जात आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Bachchu Kadu controversy : फडणवीस, शिंदेंची गरज संपताच बच्चू झाले 'कडू'..!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील माजी आमदाराचा ओढा वाढत आहे. माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार मोहन हंबरडे, माजी खासदार डी. एस. अहिरे, रमेश आडसकर, तमनगौडा पाटील, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, उदयसिंह पाटील उंडाळकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार राहुल जगताप या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Raj Thackeray News : 'मला भेटायला येऊ नका...', राज ठाकरेंनी आवाहन करताना सांगितलं खरं कारण

दुसरीकडे भाजपने देखील तगडया प्रतिस्पर्धीना पक्षात प्रवेश दिला आहे. पाटणमधील सत्यजीत पाटणकर, माजी आमदार संग्राम थोपटे, वैभव पाटील, प्रीतम म्हात्रे, माजी आमदार प्रकाश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, शेकापचे पंडीत पाटील, आस्वाद पाटील या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Raj-Uddhav Thackeray : राज - उद्धव एकत्र येणार ही जर तरची गोष्ट... तरीही भाजप-शिवसेनेने का घेतला धसका?

अद्याप काही जण वेटिंगवर

येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येथील त्याप्रमाणात महायुतीमधील इनकमिंग वाढणार आहे. अद्याप काही जण पक्षांतर करण्यासाठी इच्छुक आहेत तर काही जण वेटिंगवर आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहील आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
BJP News : प्रवेशासाठी 'भाजपच्या' कार्यालयात नेत्यांचा रांगा, कार्यकर्त्यांची तोबा गर्दी; रवींद्र चव्हाण अन् बावनकुळेंनी खास दिवसच ठेवला होता राखीव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com