BJP leader Nitesh Rane on Muslim community remarks: मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून हिंदू-मुस्लिम राजकीय वाद नवा नाही. त्यांनी आपल्या नाशिकच्या दौऱ्यात याच राजकारणावर भर दिला. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचाही अपवाद केला नाही.
नाशिकमध्ये दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यात देशभरातून हिंदू नागरिक येतील. त्यामुळे येथे मुस्लिमांना दुकाने लावू देऊ नये. कुंभमेळ्यात मुस्लिमांची दुकाने हवी कशाला? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.
या मागणीवर आपण ठाम आहोत. राज्य शासनाकडे त्यासाठी मागणी करणार आहोत. सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदी संस्कृतिशी निगडीत आहे. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडेल, असेही मंत्री राणे म्हणाले.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. हा हिंदूंचा धार्मिक उत्सव आहे. त्यात मुस्लिम नागरिकांची दुकाने हवीत कशाला? सिंहस्थात केवळ हिंदू व्यापाऱ्यांनाच दुकाने थाटण्याची परवानगी द्यावी, असे मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितले.
दुकानावर हिंदू देवतांची नावे टाकून मुस्लिम बांधव व्यावसाय करतात. कुंभमेळ्यातही हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कुंभमेळ्यात हिंदू व्यापाऱ्यांची दुकाने लागावीत. त्यासाठी साधुसंतांनी देखील सतर्क राहायला हवे असे, मंत्री राणे म्हणाले.
मुस्लिम नागरिक मूर्तिपूजा मानत नाही. त्या धर्मात मूर्तिपूजेला मान्यता नाही. हिंदू धर्माला देखील त्यांची मान्यता नाही. इतरांचे नियम आणि धर्म मान्य नसल्याने त्यांचे सिंहस्थ कुंभमेळ्यात काय काम? असा प्रश्न राणे यांनी केला.
ज्या मुस्लिम नागरिकांचे या देशावर प्रेम आहे त्यांच्याविषयी आमची कोणतीच तक्रार नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे मुस्लिम नागरिक घेतात. मात्र निवडणुकीत ते भाजपला मतदान करत नाहीत. जिहादी मानसिकतेला आमचा प्रखर विरोध राहील.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मत चोरी या विषयावर आंदोलन करणाऱ्यांवर देखील त्यांनी टीका केली. बोगस आणि दुपार नोंदणी बाबत बोलणारे वोट जिहाद बाबत गप्प का?. त्यावर देखील त्यांनी बोलले पाहिजे. जिहादी मानसिकतेच्या काही लोकांना 2047 मध्ये भारताला इस्लामिक देश करायचा आहे, असा दावा त्यांनी केला.
सिंहस्थ कुंभमेळ्याची जगभर ख्याती आहे. घरातून विविध धर्माचे लोक कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. या जागतिक उत्सवाला मंत्री राणे यांनी हिंदू मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.