Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare Video : 'जयंतरावांच्या पोटातील पाणी हालत नाही', सुनिल तटकरे असं का म्हणाले?

Sunil Tatkare on Jayant Patil : जयंत पाटील नागपूरच्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. मात्र ते विरोध पक्षांच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परत जाणार का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे.

Roshan More

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील नागपूरच्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षांच्या आंदोलनापासून ते हात राखून आहेत. विधानसभेच्या पायऱ्यांवर सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले नाहीत. त्यामुळे जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'जयंत पाटील यांच्या पोटातील पाणी कधी हालत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय आहे? हे कधी कोणाला कळू शकत नाही. ते नागपूरला आहेत मात्र विरोधी पक्षांच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत हे वृत्त वाहिनीच्या माध्यातून ऐकले.', असे सुनील तटकरे म्हणाले

'माझी त्यांची (जयंत पाटील) भेट झाली नाही. आणि भेट झाली तरी ते पोटातील पाणी हालू देतील अशी सुतराम शक्यता नाही.', असा मिश्किल टोला देखील सुनील तटकरेंनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या नऊ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद भरलेले आहे. जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रिपद रिक्त ठेवल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, असे देखील तटकरे म्हणाले.

शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अजित पवार आपल्या सहकऱ्यांच्यासोबत शरद पवारांना भेटले. तसेच जयंत पाटील हे आंदोलनात सहभागी होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपला साॅफ्ट काॅर्नर दिला जातोय का? या प्रश्नाचे उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, पवारसाहेबांचा सहा दशांचा प्रदीर्घ अनुभव आहे. जवळीक निर्माण झाली हा तर्क मांडला जातोय. मात्र, साहेबांच्या पक्षातील कोणी प्रमुख याविषयी सांगू शकेल.

भुजबळांना राज्यसभेचा प्रस्ताव

छगन भुजबळ हे मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज आहेत. मात्र, छगन भुजबळ यांचा अनुभव पाहता त्यांच्या ज्येष्ठत्वाचा फायदा दिल्लीत होऊ शकतो. त्यामुळे राज्यसभेच्या खासदारकीच्या प्रस्ताव भुजबळ यांना दिला असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT