
Congress office Mumbai : मुंबईत भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी किल्ला किल्ला कोर्टासमोर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी काँग्रेस कार्यालयासमोर मोठा राडा झाल्याची घटना घडली. मुंबईत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडले आहे.
गुरुवारी दुपारी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेस कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर गोष्टींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आंदोलकांजवळ असलेल्या फलकावर काँग्रेस संविधानाचा अपमान करत असल्याचे म्हणण्यात आलं होतं. यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलकांनी कार्यालायच्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावर खाली पाडून लाठीचार्ज केला.
दरम्यान, यावेळी काँग्रेस कार्यालयात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. “सुरुवातीला घोषणाबाजीचा आवाज आला तेव्हा आम्हाला वाटलं की, सर्वसामान्य मोर्चा असेल. पण नंतर आम्हाला जोरजोरात लाथाबुक्यांचा आवाज ऐकू आला. त्यामुळे आम्ही दरवाजा बंद केला. आम्ही सावधानता बाळगल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी ज्यावेळेला हल्ला केला त्यावेळी आम्ही सर्वजण दरवाजा बंद करुन केबिनमध्ये लपून बसलो होतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.