NCP Merger News : अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या चर्चांना ब्रेक लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विलीनकरणाच्या चर्चा सुरू होत्या असे सांगत आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणा विषयी अजितदादांनी काही सांगितले नव्हते अशी भूमिका घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्या भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारी की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, सुनील तटकरेंनी यूटर्न घेत मोठं वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंगळवारी (ता.10) येणार आहेत. तेव्हा या संदर्भात चर्चा होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा परिवार आहे. विलीनीकरणाबाबत निर्णय परिवारातील सर्व सदस्य मिळून घेतील, असे त्यांना सांगितले.
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका करत स्वतःच्या स्वार्थसाठी ते दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येऊ देत नसल्याचे म्हटले होते. शरद पवार सुत्र हाती घेतील ही त्यांनी भीती वाटत असल्याची टीका केली होती. त्यावर तटकरे यांनी कदमांना प्रत्युत्तर देत म्हटले की, आमच्या पक्षातील निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यांनी आमच्या पक्षाबाबत बोलू नये. रामदास कदम यांनी 'मातोश्री' का सोडली, अन्य लोकांची साथ का दिली हे आम्ही त्यांना विचारले नाही.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेणार
सुनेत्रा पवार या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी 10 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. त्यावेळी त्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक देखील त्या त्याच दिवशी घेणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.