Kolhapur ZP Election : बॅलेट पेपरवर निवडणूक का नाही? प्रश्न विचारत ठाकरेंच्या शिवसैनिकाने जागेवर EVM फोडले

Kolhapur ZP EVM Damage : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान बॅलेट पेपरची मागणी करत ठाकरे सेनेच्या शिवसैनिकाने ईव्हीएम फोडली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू केली.
Police officials inspect the damaged EVM at a polling booth in Bhudargad taluka, Kolhapur, after a Shiv Sena (UBT) worker protested demanding ballot paper voting.
Police officials inspect the damaged EVM at a polling booth in Bhudargad taluka, Kolhapur, after a Shiv Sena (UBT) worker protested demanding ballot paper voting.Sarkarnama
Published on
Updated on

EVM Damaged Kolhapur : लोकसभा पाटोपाठ विधानसभा निवडणूक आणि नगरपालिका महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर सर्वत्र महायुतीची सत्ता येत आहे. अशा परिस्थितीत राज्यभरातील सर्वच विरोधकांकडून खास करून काँग्रेसकडून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.

बाजूच्या कर्नाटक राज्यात देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याच्या हालचाली सुरू असताना आता कोल्हापूर जिल्ह्यात देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक का घेतली नाही? असे विचारत थेट फोडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथे एका शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ईव्हीएम फोडत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे यावेळी हा प्रकार घडला.

या संपूर्ण प्रकरामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंबंधी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्राहकसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दुपारी साडे तीनच्या सुमारास जयवंत वायदंडे हे मतदानासाठी केंद्रावर आले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र अचानक त्यांनी अधिकाऱ्यांना काही समजण्याआधी ईव्हीएम (EVM) मशीन उचलून जमिनीवर आपटले.

Police officials inspect the damaged EVM at a polling booth in Bhudargad taluka, Kolhapur, after a Shiv Sena (UBT) worker protested demanding ballot paper voting.
Kolhapur ZP Election : महायुतीतीतील दोन पक्ष विरोधात भिडणार? करवीरच्या नव्या गटात 'हॉट सीट'साठी धुमश्चक्री

घडलेल्या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मतदान केंद्रावरील गोंधळ लक्षात घेता पोलिसांनी देखील तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. या संबंधित वायदंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी निवडणूक अधिकारी आणि प्रांत अधिकारी सुरेश सूळ यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात वायदंडे यांच्या विरोधात मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Police officials inspect the damaged EVM at a polling booth in Bhudargad taluka, Kolhapur, after a Shiv Sena (UBT) worker protested demanding ballot paper voting.
Kolhapur ZP Election : राजू शेट्टींची साथ सोडण्याची रिस्क, विधानसभा अन् नगरपरिषदेत मदत; त्यानंतरही यड्रावकरांकडून सावकार मादनाईकांचा गेम?

मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्या प्रकरणी वायदंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी दिली. आज सकाळपासूनच या मतदान केंद्रावर शांत आणि उत्साह पूर्ण वातावरणात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर वायदंडे यांनी या मतदान केंद्रावर अक्षरशा गोंधळ घाला त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com