Mumbai News, 08 Feb : ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार हे येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार की ते राजकारणातून निवृत्ती घेणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
एकीकडे शरद पवारांचं वय पाहता ते आता थांबण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. शिवाय याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सूचक वक्तव्य केलं होतं. शरद पवार साहेबांची मानसिकता आता थांबायला पाहिजे अशी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मात्र, मी आणि उद्धव ठाकरेंनी, "तुमच्या सारख्या नेत्याने दिल्लीत असणं म्हणजे दिल्लीत महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणं होयं" असं सांगितलं होतं. शिवाय पवार साहेबांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना निवडून आणण्याची ताकद मविआकडे आहे, असंही राऊत म्हटले होते.
तर राऊतांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही शरद पवारांच्या राज्यसभे संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "संजय राऊत यांनी मविआच्या अनुषंगाने जे वक्तव्य केलंय, त्याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल.
मात्र, मुळात असं आहे की, शरद पवारांची पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? याबाबत राऊतांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता, असं सपकाळ म्हणाले आहेत. त्यामुळे आता शरद पवार आगामी राज्यसभेची निवडणूक लढवणार की राजकारणातून निवृत्ती घेणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.