NCP Reunification : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की पांडुरंगाची ईच्छा असली तर बहिण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा. मिटकरींच्या या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याची चर्चा सुरू झाली. मात्र, मिटकरींच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे त्यांच्यावर चांगलेच संतापले.
तटकरे म्हणाले, 'अमोल मिटकरींना सल्ला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावीत. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांना मी जाणीव करून देतो की पक्ष आणि पक्षाची भूमिका एकदा पक्षाच्याअध्यांनी मांडल्यानंतर परत कोणी बोलण्याची आवश्यकता नाही.'
'आता आम्ही राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. देशात एनडीएच्या सरकारमध्ये आहोत. हा आमचा निर्णय अधोरेखित आहे. यामध्ये जराही बदल होणे नाही. अशा घेतलेल्या भूमिकेत ज्यांना यायचे असेल तर त्यांनी यावं हे मी काल सांगितलं. त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही.', असे तटकरे म्हणाले.
'एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सामुहिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला. अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आम्ही सर्वांनी मिळून सामुहीक निर्णय घेतला. राज्यातील जनतेने आमच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.', असे देखील तटकरे यांनी सांगितले.
राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे. त्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाष्ट्रात यश मिळालं.
त्याच्यामुळे त्यांचे पाच मुख्यमंत्री ठरले होते. 40 ते 50 मंत्र्यांची नावे ठरली होती. पण विधानसभेला जनतेने त्यांना चपराख दिली. त्यांना जेंव्हा यश मिळाले तेव्हा ईव्हीएमवर मतदान झाले होते. त्यांना यश मिळाले तर कर्तृत्व आणि आम्हाला यश मिळाले तर ईव्हीएमची गडबड हे दुटप्पीपणाचे धोरण राहुल गांधी घेत आहेत.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.