Eknath Shinde Shiv Sena Supreme Court case Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena Party Symbol Case: सुप्रीम कोर्टातून महत्त्वाची अपडेट, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुढे ढकलली; कारणही आलं समोर

Political News : शिवसेना पक्ष, चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावर मंगळवारीच सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता होती.

Sachin Waghmare

New Dehli News : सुप्रीम कोर्टात गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी सुरु आहे. कोर्टात सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी मांडली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीरज कौल यांनी बाजू मांडली. बुधवारी शिंदे यांच्या शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता पक्षचिन्हाबाबत युक्तिवाद करणार आहेत. मात्र, बुधवारी न्यायमूर्ती मोहना यांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेना (Shivsena) पक्ष, चिन्हाची सुनावणी 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची चर्चा रंगलंकी आहे. ही सुनावणी लवकरच संपेल आणि दिवाळीपूर्वी निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु कदाचित दिवाळीनंतरच या प्रकरणाचा निकाल लागेल, असे आता वाटत आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपला आहे. आता शिंदेंच्या शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता पक्षचिन्हाबाबत युक्तिवाद करणार असल्याचे समजते. त्यासोबतच ज्येष्ठ वकील मणिंदरसिंग हे अपात्रतेबाबत म्हणणे मांडणार आहेत. तर ज्येष्ठ वकील शेषाद्री नायडू हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बाजू मांडतील. अरविंद दातार केंद्रीय निवडणूक आयोगाची बाजू मांडणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी पक्षचिन्हावर युक्तिवाद करणार आहेत.

कपिल सिब्बल पुन्हा एकदा करणार युक्तिवाद

एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) वकिलांनीकडून उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पुन्हा ठाकरेंचे वकील युक्तीवाद करणार आहेत. युक्तीवादासाठी दोन सेशन हवे असल्याचे कोर्टाकडे त्यांनी विनंती केली आहे. कायद्यातील मिथ दूर करण्यासाठी मला काही वेळ हवा आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, 16 जणांच्या विरोधातील प्राथमिक अपात्रतेची याचिका असल्याने कुणी चार, तर कुणी पाच आमदारांकडून युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे युक्तिवादासाठी सर्वोच्च न्यायालयाला प्रत्येकाला वेळ द्यावा लागणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना वाटते की, सगळ्यांचा युक्तिवादानंतर त्यांना एकत्रित विचार करून तयारी करायला वेळ लागेल आणि नंतर ते एका दिवसात सगळ्यांना उत्तर देणारा शेवटचा युक्तिवाद करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT