Eknath Shinde, Uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena symbol dispute : उद्धव ठाकरेंसाठी कपिल सिब्बलांचा 2 तास युक्तिवाद : पुढच्या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांची तोफ धडाडणार

Supreme Court hearing News : निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

Sachin Waghmare

New Dehli news : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचे याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्या आधी निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे कोर्टाचे निर्णयाकडे लक्ष लागले आहे. जवळपास दोन तास त्यांनी युक्तिवाद केला. आता या प्रकरणी गुरुवारी दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचे याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला.

यावेळी सुप्रीम कोर्टाने पक्षचिन्ह राजकीय पक्षाचे के विधिमंडळ पक्षाचे हाच खरा प्रश्न असल्याची टिपण्णी केली. निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतो. पण चिन्ह निवडणूक लढवत असलेल्या पक्षाला दिले जाते, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.

यावेळी सिब्बल यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेत मुख्य नेतापद नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या घटनेत नसलेले मुख्य नेतापद देण्यात आले. फुटलेल्या आमदारांनीच हा ठराव पास केला. काही जणांची नेते आणि उपनेते म्हणून नियुक्ती झाली. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली असे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचे क्रॉस व्होटिंग आणि गुवाहाटी/सुरत प्रवासाचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पक्षाध्यक्ष पदावर किंवा त्यांच्या अधिकारांवर कधीही कोणाचाही आक्षेप नव्हता. प्रतिवादी (शिंदे गट), निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्ष यांपैकी कोणीही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कधीही शंका उपस्थित केली नव्हती, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनीच पक्षाध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी तर सुनील प्रभू यांची प्रतोद पदी नियुक्ती केली होती. याबाबतची अधिकृत माहिती विधानसभा अध्यक्षांनाही देण्यात आली होती. २० जून रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत शिवसेनेच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग (विरोधात मतदान) केले, ज्यामुळे पक्षाची एक जागा भाजपच्या पारड्यात गेली. यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३१ आमदार भाजपशासित राज्यात (गुवाहाटी/सुरत) निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT