KDMC Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस? शिवसेना पदाधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत नवे राजकीय समीकरण

KDMC Elections: केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
KDMC Politics
KDMC PoliticsSarkarnama
Published on
Updated on

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे काही पदाधिकारी शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले अर्चित खडकूल यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अनेक गंभीर आरोप केले. पक्षासाठी सातत्याने काम करूनही योग्य वेळी जबाबदारी किंवा पद देण्यात आले नाही. तसेच एका बैठकीदरम्यान वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.

खडकूल यांनी सांगितले की, पक्षातील कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नव्हती. एका पदाधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याच्या घटनेनंतर नाराजी आणखी वाढली आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला. "आमची चाल कासवासारखी असली तरी शेवटी विजय आमचाच होईल," असे वक्तव्य करत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढत असल्याचा दावा केला.

KDMC Politics
Shalarth e-KYC: शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय; 'या' शिक्षकांचे वेतन रोखणार? तुम्ही 'ही' प्रक्रिया पूर्ण केलीय का?

या घडामोडींमुळे केवळ पक्षांतराची चर्चा रंगलेली नसून, महायुतीतील समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. आगामी केडीएमसी निवडणुका लक्षात घेता दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

KDMC Politics
Headmaster Promotion: TET नसतानाही मुख्याध्यापकपदाचा मार्ग मोकळा! 3 सप्टेंबर 2001 पूर्वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा

स्थानिक पातळीवरील या घडामोडी महायुतीतील अंतर्गत स्पर्धेचे संकेत मानले जात असून, निवडणुकीच्या तोंडावर अशा पक्षांतरांमुळे दोन्ही पक्षांच्या संघटनात्मक समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कल्याण-डोंबिवलीतील पुढील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  • केडीएमसी निवडणुकीपूर्वी महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत.

  • शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षावर नाराजी व्यक्त केली.

  • पक्षात योग्य पद व सन्मान मिळाला नसल्याचा अर्चित खडकूल यांचा आरोप.

  • भाजपनेही आगामी निवडणुकीत विजयाचा दावा करत शिंदे सेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

  • या पक्षांतरामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com