Ajit Pawar And Supriya Sule Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar And Supriya Sule : महायुतीत अजितदादा एकटे पडलेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'तो भाजप...'

Supriya Sule big comment about BJP in mahayuti on Ajit Pawar who is alone : महायुतीत अजित पवार एकटे पडल्याचे चित्र आहे, त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं भाष्य केलं.

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना महायुतीतूनच विरोध होत असल्याचं, तसं सध्या राज्यात चित्र आहे. अजित पवार देखील राज्यात एकटे पडलेले दिसतात.

महायुतीविरुद्ध अजित पवार, असा मॅसेज राज्यात फिरतोय. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीतील युवा नेते रोहित पाटील यांच्या घरी त्या थांबल्या होत्या. सांगलीतील नेत्यांच्या गाठीभेट घेत, त्यांनी विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळव केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार महायुतीत एकटे पडल्याच्या प्रश्नांवर त्यांनी त्यांचा अनुभव सांगत, तो भाजप आहे, असं म्हटलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "गेली 18 वर्षे बारामतीच्या लोकांनी मला खासदारकीची जबाबदारी दिली आहे. पहिले ते 'एनडीए', नंतर 'मोदी सरकार' झालं आणि आता पुन्हा 'एनडीए' झालं आहे. मित्रपक्षांनी ते कसे वागतात, ते फार जवळून मी पाहिलेलं आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, काश्मीर, ओरिसा, अशा सर्वच ठिकाणी मी त्यांना जवळून पाहिलं आहे. सत्तेतील तो मोठा पक्ष आहे, तो भाजप (BJP) काहीही मित्रपक्षांनी करू शकतो, आणि हे मी खूप जळवून पाहिलेलं आहे".

अजित पवार निवडणूक लढणार...

अजित पवार यांनी त्यांच्यासह पक्षाचे 25 आमदारांच्या निवडणुकीच्या लढतीची जागांसह पहिली यादी जाहीर केली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी ही लोकशाही आहे. कोणी कोठूनही लढू शकतो. अजित पवारांनी कोठून लढायचं, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, स्पष्ट करत, त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सांगलीतून मोठं इनकमिंग सुरू आहे, त्यावर सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात 'रामकृष्ण हरी', अशी प्रतिक्रिया देताच, हशा पिकला.

केजरीवालांना जामीन झाल्याचा आनंद...

अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर सुप्रिया सुळे यांनी 'सत्य परेशान हो सकता हैं, लेकीन पराजीत नही हो सकता', सत्याचाच शेवटी विजय झाला. आम्ही खूप आनंदी आहोत. त्यांच्यावर खूप अन्याय झाला. त्यांच्यासह अनेक विरोधकांचा अत्यंत छळ झाला. पण लढेंगे और जितेंगे, असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारला आव्हान दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT