Video NCP Politics : अजित पवारांना परतीचे दार बंदच, बारामतीसाठी देखील खास रणनीती?

Ajit Pawar Sharad pawar NCP : बारामतीमधून अजित पवार लढणार की नाही, याची चर्चा सुरू होती. मात्र, अजित पवार हे बारामतीमधूनच लढतील, असे अजित पवार गटातील नेते सांगत आहेत.
Ajit Pawar Sharad pawar
Ajit Pawar Sharad pawar sarkarnama
Published on
Updated on

NCP Politics : मागील काही दिवसांपासून अजित पवार यांचा सूर बदलल्याचे दिसत आहे. जाहीर कार्यक्रमांमधून अजित पवार घरात फूट पाडणे चूक असल्याची कबूली देत आहेत. लोकांना घरात फूट पाडलेली आवडत नाही, असे देखील सांगत आहेत. अजित पवार यांचे बदलेले सुरामुळे अजित पवार शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा होती.

अजित पवार यांचे सूर बदलला असला तरी त्यांना शरद पवार गटाचे दार हे कायमचे बंद असल्याचे शरद पवार गटातील मोठ्या नेत्याने सांगितले आहे. या विषयी 'साम टिव्ही'ने वृत्त दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. अजित पवार गटाची अवघी एक जागा निवडून आली. त्यानंतर 'माझी लाडकी बहीण' योजनेमुळे महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास महायुतींच्या नेत्यांना वाटतो आहे.

Ajit Pawar Sharad pawar
Nirmala Sitharaman : राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपवर माफी मागण्याची वेळ; काय घडलं सीतारमण यांच्यासमोर?

अजित पवार 'जन सन्मान' यात्रेद्वारे लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत मेळाव्यांच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत आहेत. या संवादामध्ये अजित पवारांनी घरात फूट पाडणे चूक असल्याचे देखील अनेकदा म्हटले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा शरद पवार गटात स्थान देण्यात येणार नाहीत. त्यांचे परतीचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचे शरद पवार गटातील सुत्रांनी 'साम'च्या प्रतिनिधीला सांगितले आहे.

बारामतीमधून अजित पवार लढणार की नाही, याची चर्चा सुरू होती. मात्र, अजित पवार हे बारामतीमधूनच लढतील, असे अजित पवार गटातील नेते सांगत आहेत. बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे. बारामतीसाठी शरद पवार गटाकडून खास रणनिती आखण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे.

Ajit Pawar Sharad pawar
NCP News : वसमतच्या आजी-माजी आमदारातील वाद विकोपाला; निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांवर टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com