Anjali Damania on Satish Bhosale sarkarnama
महाराष्ट्र

Suresh Dhas's Satish Bhosale : सतीश भोसलेचा माज? नोटांचे बंडल गाडीच्या बोनटवर टाकताना व्हिडिओ व्हायरल, एवढे पैसे आले कोठून?

Anjali Damania on Satish Bhosale : बीड मधील शिरूर तालुक्यातील एका तरुणाला मारहाण करतानाचा सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचा व्हिडिओ काल दिवसभर सोशल माध्यमातून व्हायरल झाला. यामुळे पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

Aslam Shanedivan

Beed News : बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांनी सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करून हत्या केली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यानंतर अखा महाराष्ट्र मन सुन्न झाला होता. तर यानंतर उसळलेल्या संतापामुळे मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. पण ही संतापाची लाट निर्माण केली ती भाजप आमदार सुरेश धस यांनी. पण आता त्याच धसांच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

बीडमधील कुख्यात गुंड आणि धसांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसलेने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ समोर आला होता. ज्यात त्याने बॅटने मारहाण केली होती. तर त्याच्या मदतीला एक व्यक्ती असून त्याने पाय ठेवत पाय जाम धरले होते. यानंतर बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारी आणि गुंडप्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुंड सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ सोशल माध्यमात वायरल केला आहे. ज्यात तो नोटांचे बंडल गाडीच्या बोनटवर टाकताना दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे आता नवा वाद सुरू झाला असून दमानिया यांनी हा कार्यकर्ता कोण? याच्याकडे एवढे पैसे कोठून आले? याची चौकशी करा आणि त्याला अटक करा अशी मागणी केली आहे.

बीड मधील शिरूर तालुक्यातील एका तरुणाला 2 एक वर्षांपूर्वी सुरेश धस यांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसलेने मारहाण केली होती. याचा व्हिडिओ काल दिवसभर सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. या घटनेमुळे बीडमधील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान आता सतीश भोसलेने मारहाण करण्यामागचे कारण सांगितले आहे. त्याने हा व्हिडीओ चुकीचा असून तो 2 वर्षांपूर्वीचा आहे. तर त्या व्यक्तिने महिलेची छेड काढल्यानेच त्याला आपण मारल्याचे म्हटलं आहे. तर हा प्रकार राग अनावर झाल्यामुळे घडल्याचेही त्याने म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT