Pankaja Munde Vs Anjali Damania : 'बीड'वरुन पंकजा मुंडे अन् अंजली दमानियांमध्ये जुंपली; म्हणाल्या...

Beed political controversy News : पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Anjali damniya, pankaja munde
Anjali damniya, pankaja munde Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये सीआयडीने न्यायालयात तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातुन अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरून मंत्री पंकजा मुंडे यांना पुण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यामुळे त्या संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकारांनी सीआयडीकडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपत्रामध्ये वाल्मीक कराड याचा उल्लेख असल्याबाबत विचारणा केली असता पंकजा मुंडे म्हणाल्या, याबाबत कोणतीही माहिती मला नाही. सतत त्यांनी बीडच्या गुन्हेगारी बाबत प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आता पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये महिलेवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्कार झाला आहे. मला ते प्रश्न विचारा मी पुण्यात आली आहे. तर मला बीडचे प्रश्न का विचारतात ? असा सवाल पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना केला.

Anjali damniya, pankaja munde
Shivsena UBT : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेच असावे..., आमदारांसह नेत्यांचा सूर; भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध?

यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali Damniaya) यांनी भाष्य करत पंकजा मुंडे यांनाच खोचक सवाल केला. ‘पंकजा मुंडे यांची एक प्रतिक्रिया ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणताय, मला तुम्ही पुण्यात घडलेल्या घटनेवर प्रश्न विचारा… मी आता पुण्यात आहे.

Anjali damniya, pankaja munde
Uddhav thackeray : 'आता उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करणार'; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा इशारा

पुण्यात असताना तुम्ही मला बीडमधील प्रश्न का विचारतात? अहो तुम्ही बीडमधल्या आहात. परळीला राहतात. तुम्हाला बीडमधील प्रश्न विचारणार नाही तर कोणाला विचारायचा?’, असा सवाल दमानिया यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांना केला.

Anjali damniya, pankaja munde
Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांचा गंभीर आरोप, एकनाथ शिंदेंच्या मदतीला बावनकुळे धावले, म्हणाले...

अमेरिकेत गेला तर तुम्हाला काय ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?

तुम्ही बीडच्या आहात, बीडच्या लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे तेथील घटनांचे सवाल तुम्हालाच करणार पण त्याचे प्रश्न ऐकून धक्काच बसला, जर तुम्ही फिरायला अमेरिकेत गेला तर तुम्हाला काय ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?’, असा खोचक सवाल करत दमानियांनी मुंडेंवर हल्लाबोल केला. येत्या काळात दमानियाच्या या वक्तव्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Anjali damniya, pankaja munde
Ajit Pawar : पुण्यात भगवा फडकवण्याच्या शिंदेंच्या विधानावर, दादा भडकले म्हणाले, 'लावा लाव्या करायचे बंद करा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com