Mumbai, 3 Feb: बॉलीवुडमधील 'खिलाडी' अक्षय कुमार याच्यासोबत पदार्पण करणारा वीर पहाडिया सध्या (Veer Pahariya) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात वीर पहाडिया याने महत्वाची भूमिका साकारली आहे. आपल्या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबावरुन वीरवर सोशल मीडियात नेटकरी तुटुन पडले आहेत. त्याच्या टीकेला वीरने सडेतोड उत्तर दिले आहे.
वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू, राजकीय कुटुंबामुळे त्याला बॅालीवुडमध्ये सहज एन्ट्री मिळाली, अशी टीका नेटकरी करीत आहेत. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानमधील सरगोधा एअरबेस हल्ल्यावर आधारित ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट आहे.
अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्यासोबत चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि निम्रत कौर यांनीही भूमिका साकारल्या आहेत. अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. आठ दिवसांत 104 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटानं केली आहे.
एकीकडे ‘स्काय फोर्स’ बॉक्स ऑफिस पर हिट झाला आहे. वीरच्या अभिनयाचे कौतुक होत असताना दुसरीकडे अभिनेता वीर पहाडिया याला नेटकऱ्यांनी घेरलं आहे. आपल्यावर होत असलेल्या ट्रोलिंगवर वीरने एका मुलाखतीत चांगलेच सुनावले आहे.
वीर या ट्रोलिंगबाबत मोकळेपणाने बोलला आहे. वीर हा सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे आणि मोठे उद्योजक संजय पहाडिया यांचा मुलगा आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा वीर हा भाचा आहे.
"या चित्रपटाच्या माध्यमातून कदाचित मी अद्याप प्रेक्षकांची मनं जिंकू शकलो नाही. पण यापुढच्या चित्रपटातून मी प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. या द्वेषाचं रुपांतर प्रेमात करण्यासाठी मी खूप मेहनत करेन," असे वीर याने सांगितलं.
तो म्हणाला, "प्रचंड मेहनत घेणं आणि कामाप्रती समर्पित राहणं हेच मी करू शकतो. जेणेकरून या इंडस्ट्रीतील माझ्या स्थानाला मी न्याय देऊ शकेन. मी अशी नकारात्मकता पाहत नाही. ज्यांनी चित्रपट पाहिला नसेल, त्यांचं द्वेष पसरवणं मी समजू शकतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही,"
कलाकार व्हावं, असं माझं स्वप्न आहे. माझ्या नशिबाने माझा एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्म झाला आहे. टीकाकारानं खुश करण्यासाठी मी आता काय करु, आत् हत्या करुन परत जन्म घेऊ का? असे सडेतोड उत्तर वीरने दिले आहे. माझ्यावर होत असलेली टीका मी सकारात्मकतेने घेतली आहे, असे तो म्हणाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.