Sushma Andhare hits out at Babanrao Lonikar in a fiery political statement. sarkarnama
महाराष्ट्र

Babanrao Lonikar Controversy Statement : जीभ घसरलेल्या बबनराव लोणीकरांवर सुषमा अंधारेंचा प्रहार; म्हणाल्या, 'लाचार...'

Sushma Andhare Vs Babanrao Lonikar : अंबादास दानवे यांनी देखील लोणीकरांवर टीका केली. ते म्हणाले, लोणीकर यांनी आपल्या अंगावरील कपडे, बूट एवढेच नाही तर गाडीमधील डिझेलही या जनतेमुळेच आहे याचे भान राखायला हवे.

Roshan More

Sushma Andhare News : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर कार्यक्रमातून सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांवर टीका केली. ही टीका करत असताना मात्र त्यांची जीभ घसरली. 'तुमच्या माय बापाचे पेन्शन, या लोणीकरने सुरू केली. तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदी सरकार सहा हजार रुपये देते. तुझी बहीण,बायको,आई यांना लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये लोणीकरमुळे मिळतात.', असे लोणीकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लोणीकरांना खडेबोल सुनावले आहेत.

सुषमा अंधारे म्हणाल्या, 'बबनराव हे वागणं बरं नव्हं..तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा. जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे. जनता कष्टाने कमवून खाते तुम्ही भ्रष्टाचार करून खाता.सत्ताधाऱ्यांना कुर्निसात करताना खुशमस्करे नेत्यांची संख्या वाढत चाललीय.'

पाठीचा कणा हरवलेले लोणीकरांसारखे कळपाने सापडतील, असे म्हणत फेसबूकवर लोणीकरांच्या विरोधात शेअर केलेल्या पोस्टला सुषमा अंधारे यांनी लाचार नेते असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

अंबादास दानवे यांनी देखील लोणीकरांवर टीका केली. ते म्हणाले, लोणीकर यांनी आपल्या अंगावरील कपडे, बूट एवढेच नाही तर गाडीमधील डिझेलही या जनतेमुळेच आहे याचे भान राखायला हवे.

शेतकऱ्यांच्या आसूड दाखवावा लागेल

आमदार रोहित पवार यांनी देखील लोणीकरांचा समाचार घेत त्यांना सुनावले. ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे की, भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते.

एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का? निवडणुकीआधी नरमी दाखवणारे, कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवणारे आता शेतकऱ्यांवरच खालच्या भाषेत बोलून गुरगरत असतील तर अशा लबाड लांडग्यांना शेतकऱ्यांचा आसुड दाखवावाच लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT