Nashik Revenue Department takes action against three Talathis and a Circle Officer. Sarkarnama
महाराष्ट्र

Talathis Suspended : तीन तलाठी निलंबित, मंडल अधिकाऱ्यावरही कारवाई; फेरफार नोंदीमध्ये अनियमितता

Nashik Revenue Department Action : फेरफार नोंदी आणि कामकाजात अनियमितता असल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर सहा महसूल अधिकाऱ्या्ंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Roshan More

Revenue Department News : फेरफार नोंदी आणि महसूल कामकाजात अनियमितता असलेल्या तलाठ्यांवर मोठी कारवाई झाली आहे. महसूल विभागातील तीन तलाठ्यांचे निलंबन झाले असून दोघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंढेगावचे तलाठी मनोज वाकदकर, सांजेगावचे तलाठी समीक्ष देव आणि देवदुमाला येथील सोमनाथ सांगळे या तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले. तसेच पुष्कराज निकम नितीन केदारी यांची देखील वेतनवाढ रोखण्यात आली. वाडीवऱ्हे येथीलमंडल अधिकारी बबन कोकाटे यांची देखील वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी खुलासा केला मात्र, छाननीमध्ये संबंधित कर्मचारी हे दोष असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्याकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांकडून फेरफार नोंदी, महसूल कामाकाज तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसताना देखील नोंदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधितांना नोटीस बजावताना देखील त्यामध्ये गंभीर त्रुटी ठेवण्यात आल्या होत्या. हे तपासणीत उघड झाले.

विभागीय चौकशी होणार

फेरफार नोंद हा जमिनीबाबतचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामध्ये नोंद करताना पुरेशी पडताणी आवश्यक असते. मात्र, संबंधितांनी त्यामध्ये हालगर्जी केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यातआली. तसेच एका प्रकरणात गंभीर फेरफार केल्याचा आरोप आहे. एका तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT