Tanaji Sawant Deepak Kesarkar Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena : तानाजी सावंत, दीपक केसरकरांना तब्बल पाच तास वेटींग, एकनाथ शिंदेंनी भेट नाकारली?

Tanaji Sawant Deepak Kesarkar Eknath Shinde : शिवसेनेच्या मंत्रि‍पदाच्या यादीमध्ये तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचे नाव नाही. त्यामुळे मंत्रिपद मिळवण्यासाठी या दोनही माजी मंत्र्यांची धडपड सुरू आहे.

Roshan More

Shivsena News : मंत्रि‍पदासाठी शिवसेनेतील नेते लाॅबिंग करत आहेत. तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळणार नसल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा सुरू असताना शुक्रवारी तानाजी सावंत आणि दीपक केसकर हे 'वर्षा'वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, त्यांना तब्बल पाच तास वेटींगवर थांबावे लागले. मध्यरात्री दोन वाजता एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेट दिली. या विषयीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या या दोनही नेत्यांना फडणवीस सरकारमध्ये संधी मिळणार नसल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या सावंत आणि केसरकरांना सुरूवातीला शिंदेंकडून भेट नाकारण्यात आल्याची माहिती आहे.

साम टिव्हीच्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या मंत्रि‍पदाच्या यादीमध्ये तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचे नाव नाही. त्यामुळे मंत्रिपद मिळवण्यासाठी या दोनही माजी मंत्र्यांची धडपड सुरू आहे. शु्क्रवारी शुक्रवारी पाच तास वर्षा बंगल्यावर थांबून शिंदे यांनी भेट मिळत नसल्याने ते नाराज झाले होते. मात्र त्यांना रात्री दोन वाजता त्यांना भेट देण्यात आली. या भेटीत त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची कल्पना देण्यात आली.

शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला?

रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्यांनीही सागर बंगल्यावर गर्दी केली होती. केसकर आणि सावंत यांनी देखील फडणवीसांची भेट घेतल्याची साम टीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे. तसेच मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे देखील फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते. मंत्रि‍पद मिळण्याची शक्यता असलेले संजय शिरसाट यांनी देखील फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात वादग्रस्त नेत्यांना संधी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना देखील मंत्रिपद मिळणार नसल्याच्या चर्चा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT