teacher caste controversy in municipal school Sarkarnama
महाराष्ट्र

Teacher Caste Controversy : शिक्षकाची जात फळ्यावर लिहिली, महापालिकेच्या शाळेतील प्रकरणाने सभागृहात खळबळ

Kolhapur Municipal School : कोल्हापूर महापालिकेतील शाळेतील फलकावर शिक्षकाची जात लिहिल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सभेत उमटले.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या जवाहर नगर येथील शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतील फलकावर शिक्षकांची जात लिहिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी याचा निषेध करत थेट संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

जवाहरनगरातील शाळेतील फळ्यावर शिक्षकांची जात लिहिल्यामुळे बुधवारी महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

ज्या कोणी जात लिहिण्याचे निर्देश दिले, त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.जवाहरनगर येथील शाळेत फळ्यावर शिक्षकांची जात लिहिण्याचा प्रकार घडला असल्याचा मुद्दा प्रवीण सोनवणे यांनी सभागृहात उपस्थित केला होता.

त्यावर आयुक्त राजेंद्र भारुड यांनी फळ्यावर जात लिहिण्याचे कोणी निर्देश दिले, याची चौकशी केली जाईल. संबंधित घटनेची स्थानिक पातळीवर कोणी हे निर्देश दिले आहेत का? असतील तर संबंधितांना जागेवर निलंबित करण्यात येईल, अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

सभागृहात फडकावला फलक

दरम्यान जवाहर नगर येथील शाळेत शिक्षकाची जात फलकावर लिहिला असल्याचा फलक थेट नगरसेवकांनी सभागृहात आणला. सभागृहातील ठरावावर चर्चा झाल्यानंतर इतर प्रश्नांमध्ये नगरसेवकांनी हा फलक थेट सभागृहातच फडकावून संबंधित व्यक्तीला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.

यावेळी सर्व सदस्य आपल्या जागेवर उभे राहून संबंधित अधिकारी, मुख्याध्यापकांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी लावून धरली. आदिल फरास, राजेश लाटकर यांनी कोल्हापूर ही शाहूनगरी आहे येथे जातीपातीला थारा दिला जात नाही, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT