Hingoli flag hoisting controversy : मानापमान नाट्य: ध्वजारोहणासाठी निघालेल्या भाजप खासदाराला जिल्हाधिकाऱ्यांनी रोखलं, पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही प्रकरण निवळलंच नाही...

MP Ramrao Wadkute News : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला.
Ramrao vadkute
Ramrao vadkute Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli news : भाजपचे राज्यसभेतील खासदार रामराव वडकुते यांना पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्यासोबत ध्वजवंदनाला जाण्यापासून हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी रोखले. आपली आसन व्यवस्था समोर मान्यवरांच्या सोबत केली आहे, असे म्हणत तिथे बसण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

यावर संतापलेल्या खासदार वडकुते यांनी मला का रोखता? असे म्हणत जिल्हाधिकारी गुप्ता यांना जाब विचारला. खासदारांचा रुद्रावतार पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ठीक आहे सर, तुम्ही सोबत उभे रहा, असे म्हटले. मात्र रागाने लालबुंद झालेल्या वडकुते यांनी आता मी तिथे जाणार नाही, अशी भूमिका घेत ते मागे फिरले.

या मानपान नाट्यमुळे काही वेळासाठी वातावरण तापले होते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी खासदार रामराव वडकुतेही उपस्थित होते. पालकमंत्री ध्वजवंदनासाठी ध्वज लावलेल्या ठिकाणी जात असताना त्यांच्यापाठोपाठ खासदार वडकुतेही गेले. परंतु, त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी खासदार वडकुते यांना आपली बसण्याची व्यवस्था समोर केली आहे, असे म्हणत तिथे बसण्याची विनंती केली.

Ramrao vadkute
Maharashtra News Live Update : अभिजीत दीपकेंचा सरकारला गर्भित इशारा; म्हणाले, '...तर 'सीजेपी' पुन्हा आंदोलन सुरू करेन'

यावर वडकुते यांचा पारा चढला आणि त्यांनी तुम्ही मला कसे रोखता? मी राज्यसभेचा खासदार आहे, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. हा सगळा प्रकार पालकमंत्री झिरवळ देखील पाहत होते. त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना खासदार महोदयांची आसन व्यवस्था तिकडे का केली? अशी विचारणा केली. तसेच खासदार वडकुते यांनाही ध्वजवंदनासाठी येऊ द्या असे म्हटले. परंतु, राहुल गुप्ता यांनी रोखल्यामुळे संतापलेल्या खासदार वडकुते यांनी आता मी तिथे जाणार नाही अशी भूमिका घेत, नेमून दिलेल्या आसन व्यवस्थेकडे प्रस्थान केले.

Ramrao vadkute
Maharashtra Politics Live Update: सलमान खानचं दिल्लीतील आंदोलनाबाबत मोठं विधान, म्हणाला, 'विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे आणि...'

जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या या वागणुकीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्याला नेहमीच जिल्हाधिकाऱ्यांकडून डावलले जाते, असा आरोप केला. दरम्यान, ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर माध्यमांनी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना वडकुते यांच्या नाराजीबद्दल प्रश्न केला. त्यावर आमची चूक झाली, त्याबद्दल खासदार रामराव वडकुते यांची मी दिलगिरी व्यक्त करत माफीही मागितली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी देखील मोठ्या मनाने आम्हाला माफ केले. संपूर्ण सोहळ्यात ते उपस्थित होते आताही ते माझ्यासोबत आहेत त्यामुळे आता कुठलाही वाद राहिलेला नाही, असे स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com