Dharashiv ZP school : माजी मंत्री तानाजी सावंतांच्या फोननंतरही शाळेला शिक्षक मिळेना; धाराशिव झेडपीमध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या; ग्रामस्थही रस्त्यावर

Dharashiv ZP News : परंडा तालुक्यातील सोनारी येथील झेडपी शाळेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 4 वर्षांपासून गणित विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती.
Dharashiv Zilla Parisad Reservation News
Dharashiv Zilla Parisad Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव जिल्ह्यातील एका झेडपी शाळेची दुरवस्था झाली असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या शाळेत गेल्या 4 वर्षांपासून गणित विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं, असा प्रश्न उपस्थित झाला. गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या साठी ग्रामस्थांनी शाळेला कुलुप थकले होते. त्यानंतर आमदार तानाजी सावंत यांनी याबाबत झेडपीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवरून चर्चा करून तात्काळ शिक्षक नेमण्याची सूचना केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांनी थेट झेडपीत ठिय्या मांडला आहे.

परंडा तालुक्यातील सोनारी येथील झेडपी शाळेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 4 वर्षांपासून गणित विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी ग्रामस्थांनी सोनारी येथील शाळेला कुलूप ठोकले होते.

ग्रामस्थानी या शाळेला कुलूप ठोकताच आमदार तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना फोन करून याठिकाणी त्वरित शिक्षक नेमण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही गणिताच्या शिक्षकाची नेमणूक करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत जाऊन थेट ठिय्या आंदोलन केले.

Dharashiv Zilla Parisad Reservation News
Yavatmal: धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका मॅडम गाढ झोपेत : शिक्षक नसलेल्या मद्यधुंद पतीचा खुर्चीवर बसून 'क्लास'

यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेतील सीईओंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी झेडपीमध्ये विद्यार्थी व ग्रामस्थांनी शिक्षकाची नेमणूक कारवी यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी केलेल्या घोषणबाजीमुळे सभागृह दणाणून गेले होते. त्यामुळे आता यावर आता जिल्हा परिषद काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dharashiv Zilla Parisad Reservation News
Photos: तुफान पावसात, विद्यार्थ्यांची तुफान गर्दी! संभाजीनगरमध्ये सर्वजण एकवटले; मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन ठरणार निर्णयक?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com