Devendra Fadnavis Batting
Devendra Fadnavis Batting Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : टीम इंडिया जिंकली, विधानसभेच्या ‘मॅच’चं काय? फडणवीसांचा थेट षटकार...

Rajanand More

Mumbai : टी 20 विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील अनेक राजकीय नेत्यांनी खेळाडूंचं अभिनंदन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विश्वविजेत्या टीमला शुभेच्छा दिल्या.

जळगाव येथे मीडियाशी बोलताना फडणवीस यांनी टीम इंडियाचे अभिनंदन करताना विधानसभा निवडणुकीबाबतही भाष्य केले आहे. विधानसभेची मॅचही महायुतीच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भारताने 17 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला असून त्याचा सर्व भारतियांना आनंद असल्याचे सांगितले. विराट कोहलीची बॅटिंग, सुर्यकुमार यादवचा गेमचेंजर कॅज, जयप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याची बॉलिंगचं त्यांनी कौतुक केले.

टीम इंडियाच्या खेळानंतर आता तुमचा विधानसभा निवडणुकीचा खेळ कसा असेल, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी सूचक विधान केले. ते म्हणाले, आमचा खेळही तसाच राहणार आहे. विधानसभेची मॅच आमची महायुती जिंकेल. त्यादिशेने आम्ही अग्रेसर झालो आहोत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी विरूध्द महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने युतीतील तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे आघाडीही कामाला लागली आहे.

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा करत तयारीची चुणूक दाखवली आहे. हाच अर्थसंकल्प जनतेसमोर घेऊन जात निवडणूकीला सामोरे जाण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर महाविकास आघाडीकडून या घोषणांवरून सरकारवर निशाणा साधला आहे. हा जुमला अर्थसंकल्प असल्याचे सांगत आघाडीतील नेत्यांनी त्याविरोधात रणनीती आखल्याची चर्चा आहे.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT