Prashant Kishor on Nitish Kumar : विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार..! प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

Assembly Election 2025 Bihar Election JDU : बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष एनडीएमध्ये आहे.
Prashant Kishor on Nitish Kumar
Prashant Kishor on Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Patna : बिहारमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक असल्याने सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला लॉटरी लागली. राज्यात 12 जागा मिळवत त्यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून दिली.

आता विधानसभेच्या निवडणुकीतही नितीश कुमार एनडीएसोबत असतील. मात्र, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्याशिवाय मोठं भाकित केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांची कसलीच लायकी राहणार नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते तर नितीश कुमार यांना कधीच खुर्चीवर खाली खेचले असते, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वीच नितीश कुमार एनडीएसोबत गेले आहेत.

Prashant Kishor on Nitish Kumar
Narendra Modi : रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव अन् द्रविडला PM मोदींचा फोन; काय म्हणाले?

कोणतीही स्थिती असली तरी नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेले असतात. पण 2025 मध्ये जनता त्यांना अशाप्रकारे खुर्चीवरून खाली खेचेल की ते काही बोलण्याच्याही लायक राहणार नाहीत. त्यांची स्थिती सर्वात वाईट होईल, असं भाकित प्रशांत किशोर यांनी वर्तवलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरले आहेत. नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर एनडीएच्या केंद्रातील सरकारला धोका नसेल. मात्र, सरकारकडे काठावरचे बहुमत असेल. त्यामुळे भाजपकडून सध्यातरी नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.

Prashant Kishor on Nitish Kumar
Narendra Modi : रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव अन् द्रविडला PM मोदींचा फोन; काय म्हणाले?

बिहारमधील भाजपचे काही नेते मात्र स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे बिहारच्या राजकारणासाठी पुढील काही महिने महत्वाचे मानले जात आहेत. भाजप नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढणार की स्वबळाचा नारा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com