TET Exam Sarkarnama
महाराष्ट्र

TET Exam Update : TET पेपरफुटीनंतर परीक्षार्थीसाठी आणखी एक मोठी बातमी : पुर्नपरीक्षा सप्टेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता, कारणही समोर

Maharashtra Teacher Eligibility Test news : महाराष्ट्र टीईटी परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने उमेदवारांची प्रतीक्षा वाढली असून नवीन तारखेबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

पेपरफुटीच्या सलग घटनांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणानंतर स्थगित करण्यात आलेली ही परीक्षा आता अपेक्षेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाखो उमेदवार नव्या तारखेची वाट पाहत असताना, परीक्षा सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रतीक्षेत आणखी भर पडणार आहे.

राज्यात अलीकडेच विविध परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच ठाण्यात TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची माहिती बाहेर गेल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनाला मोठा धक्का बसला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्लीपर्यंत धागेदोरे पोहोचल्याचे समोर आले असून, तपास यंत्रणांनी 3 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर नव्याने प्रश्नपत्रिका तयार करणे, तिची गोपनीयता राखणे, तांत्रिक तपासणी करणे आणि सर्व सुरक्षा प्रक्रियांची पूर्तता करणे या कामांना मोठा कालावधी लागणार असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 2.5 ते 3 महिने लागू शकतात.

राज्यातील जवळपास 6 लाख उमेदवारांनी TET परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. अनेक विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तयारी करत आहेत. मात्र पेपरफुटीमुळे परीक्षा लांबणीवर गेल्याने त्यांच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. अद्याप नव्या तारखेची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी परीक्षा सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याबाबतही विचार सुरू आहे. विशेषतः ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय शासनाच्या स्तरावर चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिक्षण विभागाने अद्याप अंतिम वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र प्रश्नपत्रिका निर्मिती, सुरक्षा व्यवस्था आणि तपास प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता TET परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. त्यामुळे आता लाखो उमेदवारांचे लक्ष अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT