Thackeray brothers’ panel defeat in BEST Patpedhi elections Sarkarnama
महाराष्ट्र

Thackeray brothers dinner : मातोश्रीवर पोहचताच भेटीमागचे राज ठाकरेंनी सांगितले 'खास' कारण

Matoshree residence meet News : पुन्हा एकदा राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्रित आलेल्या राज व उद्धव ठाकरे या दोन बंधूंमधील भेटीगाठी गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधू सातव्यांदा एकत्र आले आहेत. गेल्या रविवारी संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मातोश्री निवासस्थानी चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी 'या' भेटीचे खास कारणही सांगितले आहे.

मातोश्रीवर राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या कित्येक वर्षानंतर आले आहे. यावेळी पहिल्यांदाच अत्यंत खास व्यक्तीसोबत हे कुटुंब दाखल झाले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या आईसोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. खास करून माझ्यासोबत माझी आई आहे. ही आमची कौटुंबिक भेट आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर दिली.

मातोश्रीवर स्नेहभोजनाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. याच वेळी राज (Raj Thackeray) व उद्धव ठाकरे या दोन भावामध्ये विविध राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.

आगामी काळात होत असलेल्या महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेमध्ये युतीबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन भावातील या वाढलेल्या फेऱ्यांमुळे सध्या मनसे आणि ठाकरे गट हे एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सलग सात वेळा भेट झाली आहे. त्यामुळे ही भेट फक्त कौटुंबिक मर्यादेपुरती आहे का? की यातून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT