Shivsena UBT : मुंबई-पुणे जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोहरे हेरले : 5 नेत्यांवर महत्वाची जबाबदारी

Seat-sharing talks News : महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा होणार आहे. त्यासाठी मुंबई व पुणे महापालिकेतील जागावाटपाची बोलणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या या नेत्यावर सोपवली आहे.
Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Uddhav-Thackrey-Raj-ThackereySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीला राज्यातील सर्वच पक्ष लागले आहेत. त्यातच आता गेल्या तीन महिन्यापासून हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले राज-उद्धव ठाकर बंधू राजकीय दृष्ट्या एकत्रित येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा होणार आहे. त्यासाठी मुंबई व पुणे महापालिकेतील जागावाटपाची बोलणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या या नेत्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता जागावाटपाच्या बोलणीला वेग येणार असून लवकरच ही बोलणी पूर्ण झाल्यानंतर युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन महिन्यापासून राज व उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास पाच वेळा भेट व बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे या दोन पक्षाच्या युतीच्या बोलणीला वेग आला आहे. गेल्या 10 दिवसात संजय राऊत आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत. संजय राऊत यांनी राज ठाकरेंच निवासस्थानी येथे जाऊन भेट घेतली आहे.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Uddhav Thackrey Politics: उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर केली महायुतीची राजकीय कोंडी?

ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात बोलणी करीत असताना प्रचारात कोणते मुद्दे असणार? कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेमध्ये नवा भिडू घ्यायचा का? असे अनेक मुद्दे त्यात आहेत. संजय राऊत हे दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये दुवा म्हणून काम करतायत. मनोमिलनासाठी संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ते दोघा भावामध्ये ते मध्यस्थी करीत आहेत.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Ramdas Kadam News: एकाच वर्षात मंत्री योगेश कदमांची तीन मोठी प्रकरणं,आता घायवळ प्रकरणात 'बाप' पुन्हा मैदानात; सरकारलाच अडचणीत आणणारा दावा

उद्धव ठाकरे गटाकडून बोलणीची जबाबदारी यांच्यावर

दोन्ही पक्षांकडून स्थानिक नेते जागावाटपाची बोलणी करणार अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे गटाकडून मुंबईत वरुण सरदेसाई, अनिल परब, सूरज चव्हाण यांच्यावर जबाबदारी आहे. जागावाटपाच्या बोलणीत शेवटच्या क्षणापर्यंत काही पेच आल्यास संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून सोडवणार आहेत. दोघांचे मतदारसारखे आहेत. त्यामुळे आता हे नेते चर्चा करणार आहेत.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Ramdas Kadam News : रामदास कदम यांचं टायमिंग चुकलं; बाळासाहेबांच्या निधनाचा मुद्दा शिंदेसेनेवरच शेकणार?

पुण्यात हे नेते करणार चर्चा

पुण्यात उद्धव ठाकरे गटाकडून वसंत मोरे, आदित्य शिरोडकर आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांनी विभागवार विभाग अध्यक्षांच्या बैठका घेतल्या आहेत. कोणत्या जागा मागायच्या?आपली बलस्थानं कोणती? याची चाचपणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला. कोणत्या जागांवर दावा सांगायचा त्यावर चर्चा झाली.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Nilesh Ghaiwal: गुंड निलेशनंतर आता सचिन घायवळ पुणे पोलिसांच्या रडारवर; मोक्काअंतर्गत कारवाई करणार

ठाणे, पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेणार

येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते ठाणे, पुण्यात शरद पवार यांच्या एनसीपीला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे ठाण्यात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच आता येत्या काळात पुणे महापालिकेतदेखील ठाकरे बंधू शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेणार असल्याचे समजते.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Rohit Pawar : राम शिंदे, तानाजी सावंत ते संतोष बांगर... निलेश घायवळ कोणा कोणाचा माणूस? रोहित पवारांनी प्रत्येक गोष्ट सांगितली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com