Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचा पक्ष टोल प्रश्नावर कायम आक्रमक भूमिका घेताना दिसतो. मनसेच्या `खळखट्याक` आंदोलनामुळेच राज्यातील बहुतांश टोल नाके बंद झाल्याचा दावा आणि श्रेयही या पक्षाकडून घेतले जाते. (MNS News) ठाणे परिसरातील पाच टोल नाक्यांवरील शुल्कवाढीचा मुद्दा हाती घेत मनसेने मोठे आंदोलन केले. राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून थेट टोल नाके जाळून टाकू, अशा गर्भित इशाराच दिला.
त्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. (Shivsena) या सगळ्या घटनाक्रमावर ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक टीका केली आहे. (MNS) मनसेचे टोल आंदोलन म्हणजे बाॅक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आपटलेला चित्रपट असल्याची खिल्ली दानवे यांनी `एस्क`वरील प्रतिक्रियेतून उडवली आहे. मनसेच्या आंदोलनावर टीका केल्यानंतर आता ठाकरे गट विरुद्ध मनसे असा संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपटलेल्या सिनेमाची कहाणी, असे म्हणत दानवे यांनी मनसेच्या आंदोलनाला लक्ष्य केले. नांदेड, छत्रपती संभाजीनगरात माणसे मरत होती. (Maharashtra) अशावेळी अचानक मुंबईभोवतीच्या टोल नाक्यांचे भूत बाटलीतून बाहेर येते. टोल नाक्यांसारख्या सार्वजनिक मालमत्तांची नासधूस करणारे ताब्यात घेतले जातात आणि अवघ्या 'काही तासांत'च ते बाहेरही येतात.
मग हे उगी उगीचे आंदोलन करणाऱ्यांचे बॉस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि १५-२० मिनिटांत विषय मार्गी लागल्याचे भासवले जाते. नंतर एक मंत्री मुंबईत हिंडत फिरत एका घरात जातात आणि टोल धाड बंद करण्याचे/कमी करण्याचे पांचट आश्वासन देतात! संपला पिक्चर! रिलीज झाल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या एखाद्या सिनेमाला शोभावी अशी तीच ती व पूर्वनियोजित रटाळ कहाणी, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी मनसेच्या आंदोलनाबद्दल शंका उपस्थितीत केली.
दरम्यान, मंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. या वेळी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त परिषद घेऊन याबाबत पुढची रणनीती स्पष्ट केली आहे. काल मंत्र्यांच्या भेटीत टोलप्रश्नी काही गोष्टी ठरल्या आहेत. त्या लेखी स्वरूपात गोष्टी आणाव्यात म्हणून प्रयत्न करत आहे. नऊ वर्षांनतर या गोष्टींचा पाठपुरावा केला आहे. ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाहीत.
२०२६ पर्यंत हे करार संपतात, असे राज ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. चारचाकी वाहनांना टोल आकारला जात नाही, मग आजपर्यंत आम्हाला फसवलं. याचा अर्थ आतापर्यंत वसुली केली ती चुकीची होती, अशी लोकांची भावना आहे. टोल नाक्यांवर प्रवेश पाॅइंटवर चाकचाकी वाहनांची टोलवसुली होते का? टोलवर कोणकोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत, ज्या झाल्या नाहीत," असे राज ठाकरे म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.