Dharashiv Political News : निधी मिळत नाही म्हणून गळा काढला, तेच अजित पवार बोकांडी; आता कसं वाटतंय...

Omraje Nimbalkar News : ४० बोक्यांना सांभाळण्यासाठी स्वार्थी सरकार आहे, त्यांना शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी काही देणे-घेणे नाही.
MP Omraje Nimbalkar News
MP Omraje Nimbalkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena UBT : महागाईच्या मुद्द्यावर भाजपवर प्रखर टीका, शिवसेनेच्या फुटीर ४० आमदारांना खोके, बोके आणि गद्दाराची उपमा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंतांनी उमरग्यात " होऊ द्या चर्चा" समारोप कार्यक्रमाची सभा गाजवली. अजित पवारांकडून निधी मिळत नाही, अन्याय झाला म्हणून गळा काढणाऱ्यांच्या बोकांडी आता तेच बसले, आता कसं वाटतंय, असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सभेत लगावला. (Dharashiv Shivsena News) उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात शासनाच्या विविध योजनांचा भांडाफोड करण्यासाठी " होऊ द्या चर्चा" कार्यक्रमांतर्गत उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंतांनी चांगली वातावरण निर्मिती केली.

MP Omraje Nimbalkar News
Nanded BJP Politics : भाजपच्या `मिशन ४५ प्लस`ला नांदेडमध्ये अपशकून...

भाजपला देशातील सगळे पक्ष संपवायचे आहेत म्हणूनच गलिच्छ राजकारण सुरू आहे. (Omraje Nimagalkar) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याला दोषी ठरवत फुटीर ४० बोक्यांनी स्वतंत्र चूल मांडली. निधी मिळत नसल्याचा कांगावा करणाऱ्या बोक्यांच्या बोकांडी पुन्हा अजित पवार अर्थमंत्री झाले. (Marathwada) "सासूकरिता वाटणी केली अन् सासूच नशिबाला आली ... अशी तऱ्हा झालेली असतानाही त्यांना काहीच वाटत नाही.

४० बोक्यांना सांभाळण्यासाठी स्वार्थी सरकार आहे, त्यांना शेतकरी, शेतमजुराच्या प्रश्नांसाठी काही देणे-घेणे नाही. (Ajit Pawar) देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला पराभूत करावे लागेल, असे सांगून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे रणशिंग फुंकले. तीन-तीन वेळा आमदारकी देऊनही हे म्हणतात आमच्यावर अन्याय झाला; मग तुम्हाला आणखी काय द्यायला पाहिजे होते, असा टोला त्यांनी गद्दारांना लगावला.

उद्धव ठाकरे घरात बसून राहायचे, अशी टीका भाजपकडून केली जाते. याला ओमराजे यांनी सडेतोड उत्तर देत, उद्धव ठाकरे कोरोना काळात घरात बसून होते, मग तुमचे मोदी काय देशात फिरत होते का? मोदींची दाढी करणाऱ्यालासुद्धा येऊ दिले जात नव्हते ना; मग उद्धव ठाकरेंवर टीका कशी करता. ते घरात बसून होते, पण त्यांनी कोरोना काळा घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, असेही ओमराजे यांनी निक्षूण सांगितले. केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य व गरीब शेतकऱ्यांची विविध पद्धतीने कशी लूट करत आहे, याचा पाढाच आमदार कैलास पाटील यांनी लोकांसमोर मांडला. विमा कंपनीधार्जिणे धोरण आखत सरकारने अटी व शर्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माती केली.

पीकविमा ही फसवी व लूट करणारी योजना गुजरातमध्ये का राबविली जात नाही, गॅस सबसिडी अगदी पाच, दहा रुपयांवर आणली. मतदारांनी आता तरी सावध राहून येणाऱ्या काळात थापाड्या सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले. जोगवा मागून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी गद्दारी केली, त्यांनी ५० खोक्यांसाठी ८६ हजार मतदारांचा अपमान केला. विविध करांच्या माध्यमातून, नागरीकांच्या जमा झालेल्या रकमेतून विकासकामांसाठी निधी येतो; मग पाचशे कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगत छाती बडवायची काय गरज? असा सवाल करत कडवट शिवसैनिक सुधाकर पाटील यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर शाब्दिक प्रहार केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com