Thane Municipal Corporation  Sarkarnama
महाराष्ट्र

Thane Municipal Corporation: बढती मिळूनही 'मलिदा' विभाग सोडवेना, माजी नगरसेवकाचे महापालिका आयुक्तांना पत्र

Thane Politics Narayan Pawar Saurabh Rao: ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुखाला लाच घेताना अटक झाली. त्यानंतर अतिक्रमण विभागातील अनेकबाबी समोर येत असून काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane Politics : ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेक अधिकारी, कर्मचारी विशिष्ट विभाग सोडून दुसऱ्या विभागत जात नाही, असे देखील सांगण्यात आले. 'मलिदा' विभाग त्यांना सोडवत नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यातच भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी थेट महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत.

पवार यांनी म्हटले आहे की, 'ठाणे महापालिकेने 21 जुलै 2025 रोजी कार्यालयीन अधीक्षक व वरिष्ठ लिपिक पदावर अनेक कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली. परंतु, अतिक्रमण विभाग, शहर विकास विभाग, घनकचरा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी बढती मिळूनही पूर्वीच्याच पदावर कायम आहेत. या कर्मचाऱ्यांना तत्काळ विभागातून मुक्त करावे.'

अतिक्रमण विभाग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातील अनेक बाबी आता समोर येत आहेत. पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी 8 ऑक्टोबर 2021 रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातून 170 कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली करण्यात केली होती. मात्र, बदलीला महिना होण्याची आधीच ते 170 कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाले.

चौकशी करा

पवार यांनी आयुक्तांना 170 कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच ते कर्मचारी सध्या कुठे काम करत आहेत याची माहिती घ्यावी, असे देखील म्हटले आहे. तसेच अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षांच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता नमूद केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT