Mumbai News : विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता न्यायालयात आहे. हे प्रकरण तीन वर्षांपासून न्यायाप्रविष्ट आहे. आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत.
त्यामुळे हा गुंता सोडवण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने न्यायालयाला सुनावणी तातडीने घेण्याची विनंती याचिका दाखल केली. मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत सुनावणी 23 ऑगस्टला निश्चित केली आहे.
महाविकास आघाडीने सरकारने शिफारस केलेल्या विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा तीन वर्षांपासून आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दुर्लक्षामुळे ही नियुक्ती रखडली. या 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात सरकारकडून राजकारण होत असल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे कोल्हापूरमधील शहरप्रमुख सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या नियुक्ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामुळे कशा रखडल्या आहे, याकडे लक्ष वेधले. राज्यपालांची 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची भूमिका कायद्याच्या विसंगत, अशी होती, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.
शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाची ही विनंती याचिकेवर न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे काल सुनावणी झाली. त्यावेळी याचिका सुनावणीसाठी निश्चित करण्यात येतात, मात्र त्यावर सुनावणी वेळेत होत नाही. गेले वर्षभर सुनावणी वेळेअभावी तहकूब होत होती. त्यामुळे याचिकाकर्त्याने न्यायालयाने सुनावणी निश्चित करण्याची मागणी केली. या याचिकेची सुनावणी 23 ऑगस्टला निश्चित केली आहे.
राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या नियुक्तीच्या सुनावणी निश्चित झाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्ती आमदारांचा तिढा सुटल्यास त्याचा सर्वाधिक लाभ विद्यामान सरकार होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रकरणावर सुनावणी निश्चित होत असल्याने आमदार नियुक्तींचा मार्ग मोकळ होऊ शकतो. महायुतीचे सरकारमध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा असल्याने भाजप सर्वाधिक जागांसाठी आग्रह राहील, असे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.