Eknath Shinde 2 Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग ; कारण काय..?

CM Eknath Shinde helicopter landing spot has been changed due to emergency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भीमाशंकर दौरा असून, त्यांचे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खराब हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा लँडिंग स्पॉट इमर्जन्सी बदलावा लागला. यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भीमाशंकर दौऱ्यावर सहकुटुंबासह आहेत. मंदिरात दर्शन आणि अभिषेक करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज भीमाशंकर दौऱ्यावर आहेत. परंतु खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भीमाशंकर इथं पोचले नाही. हेलिकॉप्टरसाठी भीमाशंकर इथल्या आंबेगाव इथे लँडिंग स्पॉट होता. परंतु खराब हवामानामुळे हा लँडिंग स्पॉट लांडेवाडी इथं इमर्जन्सी करावा लागला.

पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात सध्या पावसाचा जोर कायम आहे. भीमाशंकर परिसरात दाट धुकं असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरला पुढे अडथळे येऊ लागले. त्यामुळे हेलिकॉप्टरचा लँडिंग स्पॉट लांडेवाडी इथं इमर्जन्सी करावा लगाला. यात प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं दर्शनासाठी सहकुटुंब येणार होते. तसा पूर्वनियोजित दौरा होता. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. तसंच भीमाशंकरमधील घाट माथ्यावर दाट धुकं आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अडथळे आले. भीमाशंकर मंदिरातील दर्शन आणि अभिषेकानंतर मुख्यमंत्री शिंदे ठाण्याकडे रवाना होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT