Ambadas Danve and Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve News : फडणवीसांच्या गृहखात्यावर जनतेला काडीचा विश्वास उरला नाही

Jagdish Pansare

Shivsena Political News : राष्ट्रवादीचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आणि ती राखण्याची जबाबदारी असलेल्या महायुती सरकराचे हे अपयश असून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीक करताना महाराष्ट्रातील जनतेला आता फडणवीस आणि त्यांच्या गृहखात्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाही. राज्याला खरचं पुर्णवेळ गृहमंत्री आहे का? असा सवाल केला आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अंबादास दानवे यांनी काही प्रश्न उपस्थितीत करत गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला खरच पूर्णवेळ गृहमंत्री आहे का? बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी दोन महिने अगोदर मुंबईत येतात, भाड्याने राहतात याचा मागमूस पोलिसांना कसा लागत नाही? या आरोपींना बंदूक दिली जाते तरीही कोणाला खबर कशी मिळत नाही?

हेर खात्यावर पोलिसांनी पैसे खर्च करणे बंद केले आहे का? सुरक्षा पुरवून पोलिसांनी आपली जबाबदारी संपवली का ? असे असेल तर हा हलगर्जीपणा कोणी केला? असा सवाल दानवे यांनी केला आहे. (Devendra Fadnavis) स्वतःला काडतुस-काडतुस म्हणून घेणाऱ्या गृहमंत्र्यांना आता लोकही फडतूस म्हणू लागले आहेत.

महाराष्ट्रातील पक्षफोडीचे मास्टरमाईंड आणि अधून मधून गृहमंत्री असलेल्या या माणसावर आणि त्याच्या खात्यावर सामान्य जनतेला काडीचा विश्वास उरलेला नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील गृह खात्याबद्दल काही प्रश्न उभे राहतात, याची उत्तरे गृहमंत्री देतील का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित करत सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला.

बाबा सिद्दीकी यांना सुरक्षा दिलेली असताना असा गोळीबार करून हत्या ही घटना अत्यंत भयंकर आहे. सुरक्षेत असलेल्या नेत्यांची अशी हत्या केली जात असेल तर सुरक्षा नसलेल्या लोकांबद्दल न बोललेले बरे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT