Devendra Fadnavis : सिद्दीकी प्रकरणावरून सत्तेतून पायउतार होण्याचं पवारांचं आव्हान; फडणवीस म्हणाले, “त्यांना फक्त...”

Devendra Fadnavis On Baba Siddique : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गृहमंत्री फडणवीस यांना ‘टार्गेट’ केलं जात आहे. शरद पवार यांनीही सरकारवर टीका केली होती. याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
sharad pawar | devendra fadnavis
sharad pawar | devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

बाबा सिद्दीकी यांच्याशी माझी निकटची मैत्री होती. त्यांच्या जाण्यानं आम्हाला धक्का बसला आहे. या घटनेतील दोन आरोपींना पकडण्यात आलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सिद्दीकी यांच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली होती. यालाही फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते गोंदियात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “ही दुर्दैवी आणि अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. सिद्दीकी यांच्याशी माझी निकटची मैत्री होती. या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे.

या घटनेतील दोन आरोप पकडलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही धागेदोरे आणि काही अगल्स लक्षात येत आहेत. पण, त्याबाबत लगेच बोलणं योग्य नाही. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती देतील.”

sharad pawar | devendra fadnavis
Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं घेतली? फेसबुक पोस्ट व्हायरल

याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पायउतार होण्याची गरज आहे, असं आव्हान शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी दिलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “त्यांना फक्त सत्ता पाहिजे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर फक्त महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सुरक्षा पाहायची आहे. त्यांनी खुर्चीकडे बघावे, त्यांना बोलायचे आहेत, ते त्यांनी बोलावे.”

sharad pawar | devendra fadnavis
Riteish Deshmukh On baba siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखला बसला धक्का; म्हणाला, गुन्हेगारांना...

दरम्यान, सिद्दीकी हत्या प्रकरणात तीन आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. यातील तीघांची नावे करनैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम अशी आहेत. करनैल सिंह हरियाणा आणि कश्यप, गौतम हे उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहेत. करनैल सिंह, कश्यप यांना अटक करण्यात आली आहे. तर शिवकुमार हा फरार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com