Mumbai News: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या साईडोंगर परिसरामध्ये प्रस्तावित टोरंट पॉवरच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी करण्यात येत आहे. या वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या या निर्णयाविरोधात रान पेटवलं आहे. या प्रकल्पासाठी कर्जत-भिमाशंकर भागातील सुमारे 32000 ते 32480 झाडे या प्रकल्पासाठी तोडली जातील, असा दावा केला जात आहे. याचदरम्यान, राज्य सरकारच्या काही प्रकल्पांसाठी राज्यातील 4 लाखांहून अधिक वृक्षतोड होणार असल्याचा धक्कादायक बाब समोर येत आहे.
महाराष्ट्रात पायाभूत सुविधांसाठी 133 जंगलतोडीचे त्यात एकूण तब्बल 4 लाखांहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवी दिल्लीत 23 नोव्हेंबर 2026 रोजी केंद्रीय मंत्री पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव मंडळाच्या बैठकीत प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) स्थायी समितीच्या 92 व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव होते. त्यांनी वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत वन्यजीव मंजुरीची आवश्यकता असलेल्या देशभरातील 133 प्रस्तावांवर या बैठकीत विचार करण्यात आला. यामध्ये रस्ते, संरक्षण पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी पुरवठा आणि इतर आवश्यक सार्वजनिक विकासकामांचा समावेश आहे.
यात पालघरमधील गारगाई धरण प्रकल्पासाठी 3 लाख 10 हजार 140 वृक्ष, यवतमाळ येथील मार्की मांगली 2 कोळसा खाण प्रकल्प 1 लाख 13 हजार 425 वृक्ष, गडचिरोलीमधील कुरखोडा महामार्ग 2 हजार 541 वृक्ष, नागपूर-इटारसी रेल्वे विस्तार 2 हजार 504 वृक्ष, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे प्रकल्प 353 वृक्ष यांसारख्या काही महत्त्वाच्या व मोठ्या प्रस्तावित प्रकल्पांवर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या 92 व्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
राज्यात सध्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर च्या जलविद्युत ऊर्जा साठवण (पंप-स्टोरेज) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या व प्रस्तावित वृक्षतोडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.सुमारे 3000 मेगावॅट वीज क्षमता आणि अंदाजे 13,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.हा प्रकल्प कर्जत तालुक्यातील साईडोंगर,पाली व कोथळ खलाटी परिसर अर्थात भीमाशंकर जंगलापासून सुमारे 16 किमी अंतरावर आहे.
पर्यावरणप्रेमी व विरोधकांकडून या प्रकल्पासाठी सुमारे 32000 ते 32480 झाडे तोडली जातील, असा दावा केला जात आहे. तसेच काही पर्यावरणप्रेमींच्या मते याहून अधिक झाडे बाधित होऊ शकतात. पर्यावरण व वन्यजीव: साईडोंगर व परिसरातील जंगलतोडीमुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याचा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.
यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक वृक्षतोड व भूसंपादनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.