Koyna Water Dispute : सतेज पाटील 'गोकुळ'नंतर कोयनेच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार? फडणवीस सरकारला थेट इशारा, म्हणाले "आमच्या हक्काचं पाणी..."

Satej Patil on Koyna Water : कोयना धरणातील पाणी मुंबईला नेण्यावरून आता पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी लढा उभारण्याचे संकेत दिले आहेत. कोयनेचे हक्काचे पाणी कुठंही वापरू देणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
Satej Patil | Koyna Water Dispute | Shaktipeeth Highway
Satej Patil | Koyna Water Dispute | Shaktipeeth HighwaySarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 24 Nov : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून आणि शासन नियुक्त संचालकांच्या विरोधात राज्य सरकारवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कडाडून टीका केली. राज्य सरकारच्या भूमिके विरोधात रस्त्यावर उतरलेल्या सतेज पाटीलांनी आता सरकारच्या पुढील धोरणावर आक्षेप घेत थेट भूमिका मांडली आहे.

कोयना धरणातील पाणी मुंबईला नेण्यावरून आता पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी लढा उभारण्याचे संकेत दिले आहेत. कोयनेचे हक्काचे पाणी कुठंही वापरू देणार नाही. कृष्णा लवादनुसार जे वाटप झालं त्यानुसार पाणी मिळालं पाहिजे. समुद्रात जाणाऱ्या पाण्याबाबत काय करता येईल? हा भाग वेगळा आहे. पण हक्काचं पाणी आम्ही सोडणार नाही, असं म्हणत सतेज पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला कोल्हापुरातील शेळोली येथे विरोध झाल्यावर आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. आज शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून मागे पाठवले आहे.

Satej Patil | Koyna Water Dispute | Shaktipeeth Highway
Supriya Sule : शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा सुप्रिया सुळेंनी फेटाळल्या; म्हणाल्या, "अजून पाच वर्षे..."

विकासाला शेतकऱ्यांनी कधी विरोध केला नाही. पण चुकीच्या कामांना शेतकरी विरोध करतोय. याआधी रस्ता, धरण, प्रकल्प उभारण्यासाठी जमिनी दिल्या आहेत, असंही सतेज पाटील म्हणाले. सगळंच आमच्या ओंजळीने पाणी प्यायला पाहिजे, असं सत्ताधाऱ्यांना वाटतं.जिल्हा परिषद सदस्यांना देखील निधी वाटप करताना दूजाभाव केला जातो.

Satej Patil | Koyna Water Dispute | Shaktipeeth Highway
Nashik Crime: पैशांचा पाऊस, अघोरी पूजा अन् महिलेची फसवणूक; नाशिकच्या फरार भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या

आमदार आणि मंत्री यांनी यामध्ये हक्क सांगायला नको. DPDC कशाला घेता रद्द करून टाका. अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या सदस्य निधी वाटपावरून सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या आमदार मंत्री आणि खासदारांना ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.