BJP-Akali Dal Alliance : मोठी बातमी! भाजपला सोडून गेलेला मित्रपक्ष परतला, अमित शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा!

Amit Shah Sukhbir Badal : सहा वर्षांपूर्वी युतीमधून फुटून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने पुन्हा भाजपसोबत युती केली आहे. अमित शाह आणि सुखबीर सिंह बादल यांनी युतीची घोषणा केली आहे.
BJP-Akali Dal Alliance
BJP-Akali Dal Alliance Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Panjab Politics : सहा वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनानंतर भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाने पुन्हा भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आज पत्रकार परिषद घेत जाहीर करण्यात करण्यात आला. दिल्लीमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली.

मागील दहा वर्षांपासून शिरोमणी अकाली दल हा पंजाबच्या सत्तेपासून बाहेर आहे. पंजाबमधील भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आज दिल्लीत उपस्थित आहेत. अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नबीन हे देखील उपस्थित होते.

शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्या 1997, 2002, 2007, 2012 और 2017 या पाच विधानसभा निवडणुका एकत्र युतीत लढल्या होत्या. आणि 1997, 2007 और 2012 च्या निवडणुकीत सत्ता मिळावली होती. या निवडणुकांमध्ये भाजपकडे सहा टक्के मत होती. तर, अकाली दलाकडे 18 टक्के मतांचा वाटा होता. मात्र, युती तुटल्यानंतर या मतांमध्ये फूट पडल्याची दिसते. तसेच अकाली दलाची मते ही 'आप'कडे वळल्याचे दिसून येते.

BJP-Akali Dal Alliance
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपली ताकद दाखवत तब्ब 18 टक्के मतं मिळवली होती. तर, अकाली दलाला केवळ 13 टक्के मतं मिळावी होती. पंजाबमधून आपचे सर्वाधिक खासदार विजयी झाले होते. दरम्यान, हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या मतांची टक्केवारी ही 32 पर्यंत जाते त्यामुळे सत्ताधारी आपसह काँग्रेसचीही डोकेदुखी वाढत आहे.

सर्व्हेमध्ये आप फेव्हरेट

निवडणूक सर्व्हेमध्ये आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. तर, विरोधकांमध्ये फाटाफूट होत असल्याचा फायदा त्यांना होताना दिसत होता. मात्र, आता भाजप आणि अकाली दल एकत्र आल्याने त्यांची ही लढत तिरंगी होईल, त्यामुळे आपसाठी ही निवडणूक सोपी नसेल.

BJP-Akali Dal Alliance
Punjab AAP Crisis News: पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’ला धक्का! तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.