Pune : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पोलिसांनी सोमवारी रात्री दोन तास कसून चौकशी केल्याचे समोर आले आहे. खेडकर यांच्या आई-वडिलांचा शोध सुरू असताना पोलिस वाशिम येथील गेस्ट हाऊसमध्ये पोहचले. यावेळी खेडकर यांनी आपली बाजू पोलिसांसमोर मांडल्याचे समजते.
पूजा खेडकर यांची काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. ओबीसी कोटा आणि दिव्यांग कोट्यातून निवडीसाठी पूजा यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीस समितीही नेमली आहे.
पुणे पोलिसांकडूनही बनावट कागदपत्रांबाबत तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आई-वडिलांवरही पुन्हा शेतकऱ्यांना धमकावल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घडामोडी घडत असतानाच सोमवारी रात्री 11 ते 1 यावेळेत पोलिस पूजा खेडकर राहत असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये होते. खेडकर यांनीच पोलिसांना गेस्ट हाऊसवर बोलवले होते, असे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.
तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांनी पूजा यांची चौकशी केल्याचे समजते. पूजा यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पण त्यांच्या ऑडी वाहनावर असलेल्या दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. ही गाडी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, बूजा खेडकर यांनी सोमवारी मीडियाशी बोलताना आरोपांबाबत नाराजी व्यक्त केली होती. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून आपल्याला दोष ठरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय संविधानानुसार दोषत्व सिध्द होईपर्यंत कुणीही दोषी नसते, असे सांगत पूजा यांनी माध्यमांवर आगपाखड केली. तसेच आपल्या दोषी धरले जात असल्याबाबत त्यांनी हे योग्य नसल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.