petrol & diesel Sarkarnama
महाराष्ट्र

मोठी बातमी! महायुती सरकारचा धक्का! पंपावर आता ‘नो PUC नो फ्युएल’ धोरण लागू, परिवहन मंत्र्यांचे थेट आदेश

petrol Diesel And PUC Updeate : राज्यात लवकरच "नो PUC नो फ्युएल" धोरण लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत महायुती सरकारमधील बड्या मंत्र्यानेच आदेश दिले आहेत.

Aslam Shanedivan

Summary Points

  1. महाराष्ट्र सरकार “नो PUC, नो फ्युएल” धोरण निर्देश करत आहे, ज्याद्वारे वैध PUC प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल देण्यात येणार नाही

  2. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या धोरणाची घोषणा केली, ज्यामुळे फर्जी प्रमाणपत्रे आणि प्रदूषण वाढीस प्रतिबंध केला जाईल

  3. सरकार QR-कोड आधारित डिजिटल PUC प्रमाणपत्रांची अंमलबजावणी करणार आहे, जे पेट्रोल पंपावर स्कॅन करून प्रमाणपत्राची त्वरित पडताळणी करेल

  4. हा नियम वाहन मालकांना नियमित तपासणी आणि देखभालसाठी प्रेरित करेल, तसेच फायलींगमुळे उत्पन्न होणार्‍या प्रदूषणाला थांबवायला मदत करेल

  5. अभी कोणतीही अंमलबजावणी तारीख निश्चित नाही, परंतु पुढील महिन्यांत या धोरणाचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे

Mumbai News : राज्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आली असून प्रदूषण मुक्त पर्यावरणासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्या प्रमाणे वाहनचालकांवर काही निर्बंध घालण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने आता वाहनाला दिलं जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचं असल्याचा नियम केला. तसेच भविष्यात प्रत्येक पेट्रोलपंपावर 'नो पीयूसी नो फ्युएल' धोरण ही लागू केलं जाणार आहे. तर या धोरणाची अंमलबजावणी सक्तीने करावी असे आदेशच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे आता पंपावर पीयूसी असेल तरच पेट्रोल-डिझेल मिळणार आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन करून त्याचे PUC प्रमाणपत्र तपासले जाईल. प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. त्यामुळे आपल्याकडे असणारे वाहनाचे PUC वैध असणे गरजेचे आहे.

या एका धोरणामुळे आता अवैध PUC प्रमाणपत्रांना देखील आळा बसेल असा विश्वास सरनाईक यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तर प्रत्येक PUC प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी (UID) दिली जाईल, ज्यामुळे त्याची वैधता तपासणे सोपे होईल

दरम्यान आता या धोरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून “नो पीयूसी… नो फ्युएल” धोरण सक्तीचे करण्याचे निर्देश सरनाईक यांनी पेट्रोलपंप चालकांना दिलेत. तर वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी त्याच पंपावर तात्काळ PUC काढण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत.

FAQ :

1. ‘नो PUC, नो फ्युएल’ धोरण म्हणजे काय?
हा असा नियम आहे जिथे वाहनाला वैध PUC प्रमाणपत्र नसल्यास पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही.

2. PUC प्रमाणपत्राचे QR-कोडचे महत्त्व काय आहे?
QR-कोड स्कॅन करून पेट्रोल पंपावर PUC च्या वैधतेची त्वरित पडताळणी करता येते, ज्यामुळे फर्जी प्रमाणपत्रांचा धंदा रोखता येतो.

3. या धोरणामुळे कोणत्या फायदा होतील?
हे पर्यावरण सुरक्षितता वाढवेल, फर्जी प्रमाणपत्राचा प्रसार कमी होईल, वाहन मालक नियमित तपासणी आणि देखभालीकडे प्रवृत्त होतील.

4. या धोरणाची अंमलबजावणी कधी होणार?
अद्याप धोरण आखण्यात आहे आणि पुढील काही महिन्यांत राज्यभरात लागू होण्याची शक्यता आहे.

5. वाहन मालकांनी काय उपाय करणे आवश्यक आहे?
आपण आपल्या वाहनासाठी योग्य वेळेवर PUC तपासणी करून QR-कोड असलेले वैध प्रमाणपत्र मिळवावे आणि पेट्रोल पंपावर ते दाखवावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT