Pratap Sarnaik News: 'रक्षाबंधन'मुळे एसटी महामंडळाचं नशीब फळफळलं; 4 दिवसांतच भाऊ-बहिणींनी टाकली कोट्यवधींची ओवाळणी

Raksha Bandhan MSRTC earnings : एसटी महामंडळानं यावर्षी रक्षाबंधन सणानिमित्त नेहमी होणारी प्रवाशांची अडचण दूर करताना भाऊ-बहिणींना आपापल्या घरी वेळेवर पोहोचण्यासाठी जादांच्या बसेस उपलब्ध करुन दिल्या होत्या.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. एवढंच नव्हे तर पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत बसवण्यापाठीमागे लाडक्या बहिणींचा (Ladki Bahin Yojana) मोठा वाटा आहे. आता याच लाडक्या बहि‍णींनी आर्थिक तोटा सहन करत असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मोठा दिलासा दिला आहे.

महाराष्ट्रात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये ‘महिला सन्मान योजनें’तर्गत महिलांना तिकिटाच्या दरात 50 टक्के सवलत राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. या योजनेचा आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतल्याचे आकडेवारीही पुढे आली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं लाडक्या बहि‍णींच्या जोरावर एसटी महामंडळानं विक्रमी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटी महामंडळाच्या मंगळवारी (ता.12) कमाईबाबत माहिती दिली आहे. त्यांनी राज्यभरात रक्षाबंधन सणाच्या कालावधीत म्हणजेच 8 ते 11 ऑगस्ट या अवघ्या 4 दिवसांत एसटीनं तब्बल 136.36 कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळवल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे हे उत्पन्न महामंडळाच्या यावर्षातील विक्रमी उत्पन्न ठरल्याचंही त्यांनी म्हटलं.

एसटी महामंडळानं 8 ऑगस्टला 30.06 कोटी, 9 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी 34.86 कोटी, 10 ऑगस्टला 33.36 कोटी आणि 11 ऑगस्टला 39.9 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं असून अवघ्या 4 दिवसांतच एसटी महामंडळानं एकूण 136.36 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. त्यात 11 ऑगस्ट रोजी झालेले 39.9 कोटी रुपयांचे उत्पन्न हे एका दिवसातील सर्वात जास्त उत्पन्न ठरले आहे.

Pratap Sarnaik
Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या 'वोटचोरी' कॅम्पेनला मोठा धक्का; काँग्रेसनं भावनेच्या भरात केलेली गंभीर चूक आली समोर

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 11 ऑगस्ट यादरम्यानच्या काळात तब्बल 1 कोटी 93 लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. त्यात महिला प्रवाशांची संख्या 88 लाख आहे.

एसटी महामंडळानं यावर्षी रक्षाबंधन सणानिमित्त नेहमी होणारी प्रवाशांची अडचण दूर करताना भाऊ-बहिणींना आपापल्या घरी वेळेवर पोहोचण्यासाठी जादांच्या बसेस उपलब्ध करुन दिल्या होत्या. तसेच बसेसच्या फेऱ्याही वाढवल्या होत्या. यांसह अनेक विशेष सोयी उपलब्ध करून दिल्याचीही माहिती समोर आली आहे. याचमुळे 08 ते 11 ऑगस्ट या चार दिवसांत एकूण जवळपास दोन कोटी प्रवाशांनी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास केला.

Pratap Sarnaik
Sanjay Gaikwad Controversy: 'माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही' म्हणणाऱ्या संजय गायकवाडांची 24 तासांतच पलटी; आता म्हणतात...

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले, "एसटी कर्मचारी अतिशय मेहनतीनं आणि कर्तव्यदक्ष राहून काम करत आहेत, त्यामुळेच हे विक्रमी उत्पन्न मिळवता आल्याचं नमूद केलं. यावेळी सरनाईक यांनी एसटी प्रवाशांचेही आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com