Vijay Wadettiwar News : गडचिरोलीतील आश्रमशाळील तीन विद्यार्थ्यींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या प्रकरणी आश्रमशाळेचे मुख्यमाध्यपक, अधिक्षक यांच्यासह संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मागील दोन वर्षात आश्रमशाळांमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे
दोन वर्षांत राज्यातील आश्रमशाळांमधील ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी ५ टक्के मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काँग्रेस नेते, आमदार विजयी वडेट्टीवार यांनी यावरून आदिवसी मंत्री अशोक उईके यांच्यावर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले, आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी या प्रकरणात सक्त भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी. लेचेपेचे कारभार करून ही परिस्थिती सुधारणार नाही. निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून जाब विचारला पाहिजे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने नेमलेल्या समितीने १० वर्षांपूर्वीच अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारसींच्या अंमलबजावणीची फाईल आजही धूळ खात पडली आहे.
मुलांना कॉट्स आणि मच्छरदाण्या देण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठीही लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही पण कोट्यवधीच्या प्रकल्पासाठी मात्र सरकार राबत आहे, ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडत असताना जबाबदारी नेमकी कोणाची?आदिवासी विद्यार्थ्यांचे जीव स्वस्त आहेत का? सरकारने केवळ ऑडिट करण्यापुरते मर्यादित न राहता, जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आश्रमशाळांमध्ये सुरक्षिततेच्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी देखील त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.