Jalgaon News : अवैध वाळू उपसा प्रकरण भोवलं! अमळनेरचे तहसीलदार निलंबित, आणखी एक तहसीलदार रडारवर...?

Jalgaon Tehsildar suspension, Rupeshkumar Surana : गौणखनिज चोरी, अवैध वाहतूकसंदर्भात तहसीलदारांना निष्क्रिय व बेजबाबदार धरण्यात आले आहे. महसूल विभागाने गंभीर दखल घेत थेट निलंबनाची कारवाई केली आहे.
 Tehsildar Rupeshkumar Surana  suspension
Tehsildar Rupeshkumar Surana suspensionSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी आहे. येथील तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर गौण खनिज चोरी प्रकरणी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशान्वये थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

येथील गौणखनिज चोरी, अवैध वाहतूकसंदर्भात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निष्क्रिय व बेजबाबदार धरण्यात आले आहे. दरम्यान आणखी एका तहसीलदारावर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले जात असल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सावखेडा येथे वाळू घाटावर २६ मे रोजी नियमबाह्य पद्धतीने मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारवाईत ही बाब उघडकीस आली होती. गौन खनिज उत्खननाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली होती.

 Tehsildar Rupeshkumar Surana  suspension
Jalgaon Politics : गिरीश महाजनांचा जळगावचे पालकमंत्री म्हणून उल्लेख ; गुलाबराव पाटील समोरच उभे, राजकीय चर्चांना उधाण

जिल्हाधिकारी घुगे यांनी सावखेडा येथील मंडळाधिकारी कल्याणी पाटील व तलाठी पवनकुमार शिंगारे यांच्यावर कारवाई करत त्यांना तत्काळ निलंबित केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना देण्यात आले होते.

दरम्यान, प्रांताधिकारी भंगाळे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. याच अहवालाच्या आधारे आता अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाने सुराणा यांच्या निलंबनाचे आदेश काढले असून ते गुरुवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले.

 Tehsildar Rupeshkumar Surana  suspension
Nashik Government Offices: नाशिकच्या शासकीय कार्यालयांचा होणार कायापालट : 22 कोटींची तरतूद ; जिल्हाधिकारी आयुष प्रसादांची माहिती

निलंबन मागे घेण्याची मागणी

दरम्यान, शासनाच्या या आदेशाविरोधात महसूल अधिकारी संघटनेने सुराणा यांनी केलेल्या कारवाईचे पुरावे देत त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना अमळनेर येथे पूर्ववत रूजू करावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाच्या अप्पर सचिवांना दिले आहे. श्री. सुराणा यांच्यावरील कारवाई एकतर्फी व अन्यायकारक असल्याने त्यांना सुनावणीची संधी द्यावी, त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com